S M L

सचिनची शानदार सेंच्युरी

12 मार्चदक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय बॅट्समननी जोरदार हल्ला चढवला. आणि यात आघाडीवर आहे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. वन डेमधली 48वी सेंच्युरी त्याने ठोकलीय. आणि 30 ओव्हरमध्येच भारतीय टीमला दोनशे रनचा टप्पा गाठून दिला. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे सहा सेंच्युरी सचिनच्या नावावर जमा झाल्या आहेत. तर या स्पर्धेतील त्याची ही दुसरी सेंच्युरी आहे. आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर सचिन आणि सेहवाग यांनी टीमला दणदणीत सुरुवात करुन दिली. दोघांनी 142 रनची पार्टनरशिप टीमला करुन दिली. पण सेहवाग 73 रनवर आऊट झाल्यावर सचिनने टीमचा रनरेट कमी होणार नाही याची दक्षता घेतली. आणि तीन सिक्स सात फोर मारत आपली सेंच्युरीही आता पूर्ण केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 11:50 AM IST

सचिनची शानदार सेंच्युरी

12 मार्च

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय बॅट्समननी जोरदार हल्ला चढवला. आणि यात आघाडीवर आहे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. वन डेमधली 48वी सेंच्युरी त्याने ठोकलीय. आणि 30 ओव्हरमध्येच भारतीय टीमला दोनशे रनचा टप्पा गाठून दिला. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे सहा सेंच्युरी सचिनच्या नावावर जमा झाल्या आहेत. तर या स्पर्धेतील त्याची ही दुसरी सेंच्युरी आहे. आज टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर सचिन आणि सेहवाग यांनी टीमला दणदणीत सुरुवात करुन दिली. दोघांनी 142 रनची पार्टनरशिप टीमला करुन दिली. पण सेहवाग 73 रनवर आऊट झाल्यावर सचिनने टीमचा रनरेट कमी होणार नाही याची दक्षता घेतली. आणि तीन सिक्स सात फोर मारत आपली सेंच्युरीही आता पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close