S M L

वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला पराभव

12 मार्चभारतीय टीमला या वर्ल्ड कपमध्ये आज पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट आणि दोन बॉल राखून विजय मिळवला. खराब फिल्डिंग आणि बॉलिंग हेच भारतीय पराभवाचं कारण ठरलं. शेवटच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला जिंकण्यासाठी चौदा रन हवे होते. पण रॉबिन पीटरसनने नेहराच्या पहिल्या बॉलवर फोर आणि दुसर्‍या बॉलवर सिक्स वसूल केला. आणि टीमला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी अमला, कॅलिस आणि डिव्हिलिअर्सने हाफ सेंच्युरी करत टीमला चांगली पायाभरणी करुन दिली. पण आफ्रिकेचा रनरेट कायम भारतापेक्षा कमी होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र भारतीय बॉलर्स याचा फायदा उचलू शकले नाहीत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची 48 वी वन डे सेंच्युरीही आज वाया गेली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर एकवेळ भारताची अवस्था एक विकेटवर 267 अशी बळकट होती. पण सचिन आऊट झाला आणि त्यानंतर भारताची उरलेली इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अखेर 48.4 ओव्हरमध्ये भारताची टीम 296 रनवर ऑलआऊट झाली. तुफान सुरुवातीनंतरही टीम तीनशे रन करु शकली नाही. हे रन शेवटी निर्णायक ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 12, 2011 05:34 PM IST

वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला पराभव

12 मार्च

भारतीय टीमला या वर्ल्ड कपमध्ये आज पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट आणि दोन बॉल राखून विजय मिळवला. खराब फिल्डिंग आणि बॉलिंग हेच भारतीय पराभवाचं कारण ठरलं. शेवटच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला जिंकण्यासाठी चौदा रन हवे होते. पण रॉबिन पीटरसनने नेहराच्या पहिल्या बॉलवर फोर आणि दुसर्‍या बॉलवर सिक्स वसूल केला. आणि टीमला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी अमला, कॅलिस आणि डिव्हिलिअर्सने हाफ सेंच्युरी करत टीमला चांगली पायाभरणी करुन दिली. पण आफ्रिकेचा रनरेट कायम भारतापेक्षा कमी होता. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र भारतीय बॉलर्स याचा फायदा उचलू शकले नाहीत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची 48 वी वन डे सेंच्युरीही आज वाया गेली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर एकवेळ भारताची अवस्था एक विकेटवर 267 अशी बळकट होती. पण सचिन आऊट झाला आणि त्यानंतर भारताची उरलेली इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. अखेर 48.4 ओव्हरमध्ये भारताची टीम 296 रनवर ऑलआऊट झाली. तुफान सुरुवातीनंतरही टीम तीनशे रन करु शकली नाही. हे रन शेवटी निर्णायक ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2011 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close