S M L

आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल

14 मार्चआदिवासींचा लोक संघर्ष मोर्चा हा मुंबईत दाखल झाला आहे. केंद्र सरकारनं आदिवासी समुहांना त्यांचा वनहक्क देण्याचा कायदा केला होता. पण राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी केली नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी करावी, म्हणून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या वतीनं नंदुरबार आणि जळगाव या दोन जिल्ह्यातल्या 3 हजार आदिवासी बांधवानी 'उलगुलान' ही पदयात्रा काढली. ही पदयात्रा 1 मार्चपासून निघाली आहे. या दरम्यान आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित यांनी 11 मार्च ला खर्डी येथील आदिवासी बांधवांची भेट घेतली. त्यांच्याशी आठ तास चर्चा करून काहंी मागण्या मान्य केल्या. उर्वरित मागण्या मान्य न केल्यामुळे ही पदयात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व करणार्‍या प्रतिभा शिंदे यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप करुन ते आदिवसींची फसवणूक करत असल्याचं सांगितलं. तसेच केंद्रशासनाने आदिवासी समुहांना त्यांचा वनहक्क देण्याचा कायदा केला होता. परंतु राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही असंही मत प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या वतीनं नंदुरबार आणि जळगाव या दोन जिल्ह्यातल्या 3 हजार आदिवासी बांधवानी 'उलगुलान' ही पदयात्रा काढली. ही पदयात्रा आज मुंबई येथे शिवाजी पार्कवर पोहोचणार असून, 15 मार्चला म्हणजे उद्या मंत्रालयावर जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 09:25 AM IST

आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल

14 मार्च

आदिवासींचा लोक संघर्ष मोर्चा हा मुंबईत दाखल झाला आहे. केंद्र सरकारनं आदिवासी समुहांना त्यांचा वनहक्क देण्याचा कायदा केला होता. पण राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी केली नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी करावी, म्हणून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या वतीनं नंदुरबार आणि जळगाव या दोन जिल्ह्यातल्या 3 हजार आदिवासी बांधवानी 'उलगुलान' ही पदयात्रा काढली. ही पदयात्रा 1 मार्चपासून निघाली आहे. या दरम्यान आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावित यांनी 11 मार्च ला खर्डी येथील आदिवासी बांधवांची भेट घेतली. त्यांच्याशी आठ तास चर्चा करून काहंी मागण्या मान्य केल्या. उर्वरित मागण्या मान्य न केल्यामुळे ही पदयात्रा मुंबईत दाखल झाली आहे.

या पदयात्रेचे नेतृत्व करणार्‍या प्रतिभा शिंदे यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप करुन ते आदिवसींची फसवणूक करत असल्याचं सांगितलं. तसेच केंद्रशासनाने आदिवासी समुहांना त्यांचा वनहक्क देण्याचा कायदा केला होता. परंतु राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही असंही मत प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या वतीनं नंदुरबार आणि जळगाव या दोन जिल्ह्यातल्या 3 हजार आदिवासी बांधवानी 'उलगुलान' ही पदयात्रा काढली. ही पदयात्रा आज मुंबई येथे शिवाजी पार्कवर पोहोचणार असून, 15 मार्चला म्हणजे उद्या मंत्रालयावर जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close