S M L

आयबीएन लोकमतच्या टीमवर हल्ला करणार्‍या माफियाला अटक आणि जामीन

14 मार्चमुरूड जंजिरा तालुक्यातील मुरुड येथील एकदरा गावामध्ये आयबीएन लोकमतची टीम वृतांकन करण्यासाठी गेली असता टीमवर महिलांनी हल्ला केला होता. या प्रकरणी डिझेल माफिया मोतीराम पाटील याला अखेर पोलिसांनी अटक केली. मात्र लगेचच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मोतीराम पाटीलसह त्याची पत्नी नंदा पाटील, मुलगी नर्गिस मडवी आणि जावई अरूण मडवी यांनाही अटक करण्याम आली होती त्यांचीही सुटका करण्यात आली. कलम 143, 147 आणि 148 नुसार कारवाई करण्यात आली होती. दंगल भडकवणे आणि मारहाण असे जुजबी गुन्हे दाखल केल्याने मोतीराम जामीनही मंजूर झाला. ऍडिशनल एस.पी. संजय अपरांती यांनी ही माहिती दिली. 11 मार्चला आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी अलका धूपकर, व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवार हे सकाळी अकरा वाजता एकदरा गावामध्ये पोहचले. मोहन जाधव हा आमचा अलिबागच्या रिपोर्टर सुद्धा या टीमसोबत होता. या गावामध्ये हनुमान मच्छीमार सहकारी व्यावसायिक संस्थेचा माजी अध्यक्ष मोतीराम चाया पाटील यांच्याकडून गावातल्या 40 कुटुंबाना बहिष्कृत करण्यात आलंय अशी तक्रार या ग्रामस्थांनी आयबीएन लोकमतकडे दिली होती. त्यानुसार दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकूण बातमी करण्यासाठी आमची टीम गेली होती. पण या टीमवरच तिथल्या महिलांनी हल्ला केला. मोतीराम पाटील याच्या घरातूनच या हल्ल्याची सूत्रं चालू होती. त्यांनी आमचा कॅमेराही हिसकावून घेतला. आणि त्याची मोडतोड केली. शूटिंग केलेली एक टेपही गायब करण्यात आली. एवढंच नव्हे तर आयबीएन लोकतचा बूम माईक आणि लोगो आयडीही या महिलांनी गायब केला. आयबीएन लोकमतच्या टीमने दोन तास तक्रारदारांचं शूटिंग करुन दुसर्‍या बाजूचं म्हणणं जाणून घेण्यासाठी मोतिराम चाया पाटील याच्या घराच्या दिशेने गेली. तिथं मोतिराम अध्यक्ष असलेल्या हनुमान सहकारी संस्थेच्या बोर्डचं आणि डिझेलच्या पंपाचं शूटिंग आमच्या टीमनं केलं. त्याचवेळी महिलांचा एक जमाव या टीमवर आणि आमच्या टीमसोबत असलेल्या स्थानिक तक्रारदारांवर धाऊन आला. शूटिंग का करता ? असं म्हणून त्या महिला आमच्या टीमच्या अंगावर धाऊन आल्या. त्यानंतर कॅमेरा बंद करुन आमची टीम तिथून निघाली. पण या महिलांचे तीन मोठे जमाव आमच्या टीमच्या आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या अंगावर धाऊन आले. जगदीश दामशेठ या मच्छीमारावर दगडफेक करण्यात आली. त्यात त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. तर रश्मीकांत चंद्रकांत पाटील याच्या अंगावर महिलांच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर लाथांनी मारहाण करण्यात आली. त्याला अलिबागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर किरण बाथम या स्थानिक पत्रकारांनी समयसूचकता दाखवून घेतलेल्या या काही शूटिंगमुळे जखमीं आणि त्यांच्या नातलगांचा आक्रोशही पाहता येतोय. आता याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केलीय. एफआयआर मुरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 12:57 PM IST

आयबीएन लोकमतच्या टीमवर हल्ला करणार्‍या माफियाला अटक आणि जामीन

14 मार्च

मुरूड जंजिरा तालुक्यातील मुरुड येथील एकदरा गावामध्ये आयबीएन लोकमतची टीम वृतांकन करण्यासाठी गेली असता टीमवर महिलांनी हल्ला केला होता. या प्रकरणी डिझेल माफिया मोतीराम पाटील याला अखेर पोलिसांनी अटक केली. मात्र लगेचच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मोतीराम पाटीलसह त्याची पत्नी नंदा पाटील, मुलगी नर्गिस मडवी आणि जावई अरूण मडवी यांनाही अटक करण्याम आली होती त्यांचीही सुटका करण्यात आली. कलम 143, 147 आणि 148 नुसार कारवाई करण्यात आली होती. दंगल भडकवणे आणि मारहाण असे जुजबी गुन्हे दाखल केल्याने मोतीराम जामीनही मंजूर झाला. ऍडिशनल एस.पी. संजय अपरांती यांनी ही माहिती दिली.

11 मार्चला आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी अलका धूपकर, व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवार हे सकाळी अकरा वाजता एकदरा गावामध्ये पोहचले. मोहन जाधव हा आमचा अलिबागच्या रिपोर्टर सुद्धा या टीमसोबत होता. या गावामध्ये हनुमान मच्छीमार सहकारी व्यावसायिक संस्थेचा माजी अध्यक्ष मोतीराम चाया पाटील यांच्याकडून गावातल्या 40 कुटुंबाना बहिष्कृत करण्यात आलंय अशी तक्रार या ग्रामस्थांनी आयबीएन लोकमतकडे दिली होती. त्यानुसार दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकूण बातमी करण्यासाठी आमची टीम गेली होती. पण या टीमवरच तिथल्या महिलांनी हल्ला केला. मोतीराम पाटील याच्या घरातूनच या हल्ल्याची सूत्रं चालू होती. त्यांनी आमचा कॅमेराही हिसकावून घेतला. आणि त्याची मोडतोड केली. शूटिंग केलेली एक टेपही गायब करण्यात आली. एवढंच नव्हे तर आयबीएन लोकतचा बूम माईक आणि लोगो आयडीही या महिलांनी गायब केला.

आयबीएन लोकमतच्या टीमने दोन तास तक्रारदारांचं शूटिंग करुन दुसर्‍या बाजूचं म्हणणं जाणून घेण्यासाठी मोतिराम चाया पाटील याच्या घराच्या दिशेने गेली. तिथं मोतिराम अध्यक्ष असलेल्या हनुमान सहकारी संस्थेच्या बोर्डचं आणि डिझेलच्या पंपाचं शूटिंग आमच्या टीमनं केलं. त्याचवेळी महिलांचा एक जमाव या टीमवर आणि आमच्या टीमसोबत असलेल्या स्थानिक तक्रारदारांवर धाऊन आला. शूटिंग का करता ? असं म्हणून त्या महिला आमच्या टीमच्या अंगावर धाऊन आल्या. त्यानंतर कॅमेरा बंद करुन आमची टीम तिथून निघाली. पण या महिलांचे तीन मोठे जमाव आमच्या टीमच्या आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या अंगावर धाऊन आले. जगदीश दामशेठ या मच्छीमारावर दगडफेक करण्यात आली. त्यात त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. तर रश्मीकांत चंद्रकांत पाटील याच्या अंगावर महिलांच्या जमावाने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीवर लाथांनी मारहाण करण्यात आली. त्याला अलिबागच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर किरण बाथम या स्थानिक पत्रकारांनी समयसूचकता दाखवून घेतलेल्या या काही शूटिंगमुळे जखमीं आणि त्यांच्या नातलगांचा आक्रोशही पाहता येतोय. आता याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केलीय. एफआयआर मुरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close