S M L

अंधेरीत भरदिवसा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गोळीबार ; 2जणांचा मृत्यू

14 मार्चमुंबईतल्या अंधेरीत एका बिल्डरच्या साईट ऑफिसमध्ये दोन इंजिनिअर्सची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 4 अनोळखी मोटारसायकलस्वारांनी बिल्डिंगच्या आवारात शिरून बिल्डरच्या ऑफिसमध्ये गोळीबार केला. साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सहाना बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्सच्या साईटवरील ही घटना आहे. दोन्ही इंजिनिअर्सवर 4 राऊंड्स फायर करण्यात आले. या गोळीबारात एक इंजिनिअर जागीच ठार झाला तर दुसर्‍या इंजिनिअरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत इंजिनिअर्सची नावं योगेश कुडे आणि सम्राट देवर्षी अशी आहेत. गँगस्टर रवी पुजारी टोळीचा या हत्येमागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 12:38 PM IST

अंधेरीत भरदिवसा बिल्डरच्या ऑफिसमध्ये गोळीबार ; 2जणांचा मृत्यू

14 मार्च

मुंबईतल्या अंधेरीत एका बिल्डरच्या साईट ऑफिसमध्ये दोन इंजिनिअर्सची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 4 अनोळखी मोटारसायकलस्वारांनी बिल्डिंगच्या आवारात शिरून बिल्डरच्या ऑफिसमध्ये गोळीबार केला. साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सहाना बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्सच्या साईटवरील ही घटना आहे. दोन्ही इंजिनिअर्सवर 4 राऊंड्स फायर करण्यात आले. या गोळीबारात एक इंजिनिअर जागीच ठार झाला तर दुसर्‍या इंजिनिअरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत इंजिनिअर्सची नावं योगेश कुडे आणि सम्राट देवर्षी अशी आहेत. गँगस्टर रवी पुजारी टोळीचा या हत्येमागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close