S M L

सायन हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचा बेमुदत कामबंद आंदोलनचा इशारा

14 मार्चसायन हॉस्पिटलमध्ये सफाई कामगारांचं आऊटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव डीन डॉ. संध्या कामत यांनी ठेवला आहे. पण सायन हॉस्पिटलमधल्या कर्मचारी संघटनांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. बीएमसीच्या पुढील स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला जाणार आहेत. हा प्रस्ताव तातडीेने रद्द करावा, या मागणीसाठी आज सायन हॉस्पिटमध्ये कर्मचारी संघटनांनी एक निषेध सभा घेतली. म्युन्सिपल मजदूर युनियन आणि म्युन्सिपल कर्मचारी युनियन या दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे आऊटसोर्सिंगला विरोध केला. बीएमसी प्रशासनाने आज रात्रीपर्यंत याबाबत ठोस उत्तर न दिल्यास उद्या सकाळी सात वाजल्यापासून सायन हॉस्पिटलमधले सर्व कर्मचारी, नर्सेस आणि वॉर्ड बॉय कामबंद आंदोलन पुकारतील असा इशाराही आजच्या बैठकीत देण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 14, 2011 03:42 PM IST

सायन हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांचा बेमुदत कामबंद आंदोलनचा इशारा

14 मार्च

सायन हॉस्पिटलमध्ये सफाई कामगारांचं आऊटसोर्सिंग करण्याचा प्रस्ताव डीन डॉ. संध्या कामत यांनी ठेवला आहे. पण सायन हॉस्पिटलमधल्या कर्मचारी संघटनांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. बीएमसीच्या पुढील स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला जाणार आहेत. हा प्रस्ताव तातडीेने रद्द करावा, या मागणीसाठी आज सायन हॉस्पिटमध्ये कर्मचारी संघटनांनी एक निषेध सभा घेतली. म्युन्सिपल मजदूर युनियन आणि म्युन्सिपल कर्मचारी युनियन या दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे आऊटसोर्सिंगला विरोध केला. बीएमसी प्रशासनाने आज रात्रीपर्यंत याबाबत ठोस उत्तर न दिल्यास उद्या सकाळी सात वाजल्यापासून सायन हॉस्पिटलमधले सर्व कर्मचारी, नर्सेस आणि वॉर्ड बॉय कामबंद आंदोलन पुकारतील असा इशाराही आजच्या बैठकीत देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 14, 2011 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close