S M L

वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराचा फैलाव !

अजित मांढरे, मुंबई15 मार्चअर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. माफियाविरोधात मोर्चे काढून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केली जात आहेत. पण सरकारी व्यवस्थेचे रखवालदार असलेल्या अधिकार्‍यांनी अधिकारांचा गैरवापर करणं सुरुच ठेवलंय. या मस्तवाल अधिकार्‍यांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री आता तरी काही कारवाई करणार आहेत का ? आणि करणार तर कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला. अँटी करप्शन ब्युरोने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तीन प्रमुख आणि ज्येष्ठ अधिकार्‍यांविरोधात 120 ब कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. क्रिमिनल कॉन्परसी म्हणजेच संघटितपणे गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या यादीमध्ये कोणकोण अधिकारी आहेत यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे, वैद्यकीय शिक्षण उपसंचालक प्रविण शिंगारे आणि माजी उपसचिव गो. ना. रणखांबे. वैद्यकीय उपकरणे खरेदी केल्यावर ते बसवून सुरु झाल्यानंतर विक्रेत्याला उरलेली 10 टक्के रक्कम देण्यात येते. असा एक शासकीय नियम आहे. ही उपकरणे खरेदी करताना हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवला गेला आणि इथेच या घोटाळ्याला वाचा फुटली.वैद्यकीय उपकरण खरेदीचा भ्रष्टाचार- 2009 मध्ये झाली वैद्यकीय उपकरण खरेदी- मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्ससाठी झाली खरेदी- पुणे : 10 व्हेंटीलेटर्स- औरंगाबाद : 2 व्हेंटीलेटर्स- नागपूर : 1 व्हेंटीलेटर- कोल्हापूर : 1 व्हेंटीलेटर- एका व्हेंटीलेटरची किंमत बाजारभावानुसार : 11 लाख 31 हजार 714 रुपये- खरेदीचा दर मात्र 30 लाख 40 हजार रुपये दराने- एकूण14 व्हेंटीलेटर्सची किंमत : 1 कोटी 58 लाख 44 हजार- खरेदी झाली 4 कोटी 25 लाख 60 हजार रुपयांना- 2010 :औरंगाबाद हॉस्पिटलसाठी कॅन्सर निदान करणारी लिनॅक मशीन खरेदीत गैरव्यवहार- 10 कोटी रुपयांची मशीन 17 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलीपण, ही खरेदी ज्यांच्या परवानगीने झालीय ते मात्र याबद्दल काहीच बोलायला तयार नाही. ऍण्टी करप्शन ब्युरोने या तपासाचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळेच एरव्ही या विभागाच्या प्रगतीचा डांगोरा पिटणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित आपल्या या अधिकार्‍यांवर कडक कारवाई कधी करणार हा प्रश्न विचारला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 11:58 AM IST

वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराचा फैलाव !

अजित मांढरे, मुंबई

15 मार्च

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले आहेत. माफियाविरोधात मोर्चे काढून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केली जात आहेत. पण सरकारी व्यवस्थेचे रखवालदार असलेल्या अधिकार्‍यांनी अधिकारांचा गैरवापर करणं सुरुच ठेवलंय. या मस्तवाल अधिकार्‍यांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री आता तरी काही कारवाई करणार आहेत का ? आणि करणार तर कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला.

अँटी करप्शन ब्युरोने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तीन प्रमुख आणि ज्येष्ठ अधिकार्‍यांविरोधात 120 ब कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. क्रिमिनल कॉन्परसी म्हणजेच संघटितपणे गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या यादीमध्ये कोणकोण अधिकारी आहेत यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे, वैद्यकीय शिक्षण उपसंचालक प्रविण शिंगारे आणि माजी उपसचिव गो. ना. रणखांबे.

वैद्यकीय उपकरणे खरेदी केल्यावर ते बसवून सुरु झाल्यानंतर विक्रेत्याला उरलेली 10 टक्के रक्कम देण्यात येते. असा एक शासकीय नियम आहे. ही उपकरणे खरेदी करताना हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवला गेला आणि इथेच या घोटाळ्याला वाचा फुटली.

वैद्यकीय उपकरण खरेदीचा भ्रष्टाचार

- 2009 मध्ये झाली वैद्यकीय उपकरण खरेदी- मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्ससाठी झाली खरेदी- पुणे : 10 व्हेंटीलेटर्स- औरंगाबाद : 2 व्हेंटीलेटर्स- नागपूर : 1 व्हेंटीलेटर- कोल्हापूर : 1 व्हेंटीलेटर- एका व्हेंटीलेटरची किंमत बाजारभावानुसार : 11 लाख 31 हजार 714 रुपये- खरेदीचा दर मात्र 30 लाख 40 हजार रुपये दराने- एकूण14 व्हेंटीलेटर्सची किंमत : 1 कोटी 58 लाख 44 हजार- खरेदी झाली 4 कोटी 25 लाख 60 हजार रुपयांना- 2010 :औरंगाबाद हॉस्पिटलसाठी कॅन्सर निदान करणारी लिनॅक मशीन खरेदीत गैरव्यवहार- 10 कोटी रुपयांची मशीन 17 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली

पण, ही खरेदी ज्यांच्या परवानगीने झालीय ते मात्र याबद्दल काहीच बोलायला तयार नाही. ऍण्टी करप्शन ब्युरोने या तपासाचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळेच एरव्ही या विभागाच्या प्रगतीचा डांगोरा पिटणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित आपल्या या अधिकार्‍यांवर कडक कारवाई कधी करणार हा प्रश्न विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close