S M L

डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ मार्डचं काम बंद आंदोलन

15 मार्चऔरंगाबादच्या सरकारी रूग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे सरकारी रूग्णालयात रु ग्णांची गैरसोय होत आहे. या कामबंद आंदोलनामुळे आज 22 शस्रक्रिया रद्द करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपीला अटक झालेली असली तरी पोलिसांनी डॉक्टरांनाही दमदाटी केल्याचा मार्डचा आरोप आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. मार्डनं पुकारलेल्या काम बंद आंदोलनापाठोपाठ आता सरकारी दंत रूग्णालयातील विद्यार्थ्यांनीही अंत्यत गंभीर आरोप करीत संप पुकारला आहे. पाणीटंचाई, वसतिगृहावर मुलींची होणारी छेडछाड आणि रूग्णालयातील अनागोंदीविरूध्द शिकाऊ डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रूग्णसेवा कोलमडली आहे. सरकारी रूग्णालयातील वार्ड क्रमांक एकवीसमध्ये डॉक्टरांचा राऊंड सुरू असताना भागीनाथ हिवराळे या त्याच्या मित्राच्या मुलाला बघण्यासाठी आला होता. राऊंड सुरू असल्यामुळे थोडा वेळ थांंबावे लागेल असे त्याला शिपायानं सांगितले. त्यावेळी त्याने हुज्जत घातली. डॉ. सौरभ पाटील आणि डॉ. मनोज पाटील या दोघांनीही त्याना समजावून सागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी त्याला पक़डून पोलिसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी डॉक्टरांनाच तक्रार द्या मगच आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल असं सांगितल्याने पोलीस आणि डॉक्टरांचा वाद विकोपाला गेला. अखेर मारहाण आणि पोलिसांच्या भूमिकेविरूध्द निदर्शने करीत मार्डने काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 12:29 PM IST

डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ मार्डचं काम बंद आंदोलन

15 मार्च

औरंगाबादच्या सरकारी रूग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे सरकारी रूग्णालयात रु ग्णांची गैरसोय होत आहे. या कामबंद आंदोलनामुळे आज 22 शस्रक्रिया रद्द करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपीला अटक झालेली असली तरी पोलिसांनी डॉक्टरांनाही दमदाटी केल्याचा मार्डचा आरोप आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. मार्डनं पुकारलेल्या काम बंद आंदोलनापाठोपाठ आता सरकारी दंत रूग्णालयातील विद्यार्थ्यांनीही अंत्यत गंभीर आरोप करीत संप पुकारला आहे. पाणीटंचाई, वसतिगृहावर मुलींची होणारी छेडछाड आणि रूग्णालयातील अनागोंदीविरूध्द शिकाऊ डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रूग्णसेवा कोलमडली आहे.

सरकारी रूग्णालयातील वार्ड क्रमांक एकवीसमध्ये डॉक्टरांचा राऊंड सुरू असताना भागीनाथ हिवराळे या त्याच्या मित्राच्या मुलाला बघण्यासाठी आला होता. राऊंड सुरू असल्यामुळे थोडा वेळ थांंबावे लागेल असे त्याला शिपायानं सांगितले. त्यावेळी त्याने हुज्जत घातली. डॉ. सौरभ पाटील आणि डॉ. मनोज पाटील या दोघांनीही त्याना समजावून सागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरूवात केली. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी त्याला पक़डून पोलिसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी डॉक्टरांनाच तक्रार द्या मगच आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल असं सांगितल्याने पोलीस आणि डॉक्टरांचा वाद विकोपाला गेला. अखेर मारहाण आणि पोलिसांच्या भूमिकेविरूध्द निदर्शने करीत मार्डने काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close