S M L

कोणताही निर्णय एकट्याचा नाही !

15 मार्चकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची आज सीबीआयनं दुसर्‍यांदा चौकशी केली. स्पर्धांदरम्यान आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्याविषयी सीबीआयनं आज त्यांची चौकशी केली. स्टॉप वॉचच्या संदर्भात एका स्वीस कंपनीला कंत्राट देण्याच्या मुद्यावरूनही सीबीआयने आज मंगळवारी त्यांना काही प्रश्न विचारले. तसेच स्पर्धेदरम्यानच्या केटरिंगच्या कंत्राटावरूनही कलमाडी अडचणीत आलेत. त्यांनी ऐनवेळी हे कंत्राट रद्द अनामत रकमेच्या मुद्‌यावरून रद्द केलं होतं. स्टॉप वॉच आणि केटरिंगसाठी लागणारं 2.8 कोटी रूपयाचे सामान तब्बल 40 कोटी रूपयांना विकत घेतल्याचा ठपका आयोजन समितीवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली सुरेश कलमाडींची चौकशी संध्याकाळी सात वाजता संपली. परंतु कॉमनवेल्थप्रकरणी अनेक एजन्सी कार्यरत होत्या. त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कलमाडींनी केली आहे. कोणताही निर्णय एकट्याचा नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 03:14 PM IST

कोणताही निर्णय एकट्याचा नाही !

15 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची आज सीबीआयनं दुसर्‍यांदा चौकशी केली. स्पर्धांदरम्यान आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्याविषयी सीबीआयनं आज त्यांची चौकशी केली. स्टॉप वॉचच्या संदर्भात एका स्वीस कंपनीला कंत्राट देण्याच्या मुद्यावरूनही सीबीआयने आज मंगळवारी त्यांना काही प्रश्न विचारले.

तसेच स्पर्धेदरम्यानच्या केटरिंगच्या कंत्राटावरूनही कलमाडी अडचणीत आलेत. त्यांनी ऐनवेळी हे कंत्राट रद्द अनामत रकमेच्या मुद्‌यावरून रद्द केलं होतं. स्टॉप वॉच आणि केटरिंगसाठी लागणारं 2.8 कोटी रूपयाचे सामान तब्बल 40 कोटी रूपयांना विकत घेतल्याचा ठपका आयोजन समितीवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली सुरेश कलमाडींची चौकशी संध्याकाळी सात वाजता संपली. परंतु कॉमनवेल्थप्रकरणी अनेक एजन्सी कार्यरत होत्या. त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी कलमाडींनी केली आहे. कोणताही निर्णय एकट्याचा नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close