S M L

मुंबईत पाच उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल

15 मार्चमुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या पाच उपोषणकर्त्यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. आदिवासी आयटीआयच्या राज्यभरातील कर्मचार्‍यांनी हे 10 मार्चपासून उपोषण सुरू केलंय. सुमारे 200 तरूण इथे उपोषण करत आहे. सध्या या आयटीआय सेंटर्सना दरवर्षी मुदतवाढ देण्यात येते. त्याऐवजी हे आदिवासी आयटीआय कायमस्वरूपी करावेत आणि कर्मचार्‍यांनाही कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी यांची मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी आझाद मैदानात उपोषण करायला बसले असताना त्यांच्या पाच कर्मचार्‍यांना चक्कर आली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 04:08 PM IST

मुंबईत पाच उपोषणकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल

15 मार्च

मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या पाच उपोषणकर्त्यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. आदिवासी आयटीआयच्या राज्यभरातील कर्मचार्‍यांनी हे 10 मार्चपासून उपोषण सुरू केलंय. सुमारे 200 तरूण इथे उपोषण करत आहे. सध्या या आयटीआय सेंटर्सना दरवर्षी मुदतवाढ देण्यात येते. त्याऐवजी हे आदिवासी आयटीआय कायमस्वरूपी करावेत आणि कर्मचार्‍यांनाही कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी यांची मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी आझाद मैदानात उपोषण करायला बसले असताना त्यांच्या पाच कर्मचार्‍यांना चक्कर आली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close