S M L

जपानपुढे किरणोत्सर्गाची समस्या

15 मार्चभूकंप आणि सुनामीनंतर जपानपुढे सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली किरणोत्सर्गाची. फुकुशिमा दायाची अणुऊर्जा प्रकल्पात एका पाठोपाठ एक तिथल्या अणुभट्‌ट्यांमध्ये स्फोट होत आहे. यातून किरणोत्सर्गाचा धोका वाढला आहे. जपानमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला तेव्हा अणुभट्टी सुरक्षितरित्या बंद करण्यासाठी पहिली यंत्रणा कार्यरत झाली. अणुभट्टीतील कंट्रोल रॉड अर्थात मॉडरेटर रॉड रिऍक्टरमध्ये सरकवणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. फ्युअल रॉड अद्यापही खूप गरम असल्याने त्यांना थंड करणारी कुलंट यंत्रणा मात्र आता योग्यरित्या काम करत नव्हती.भुकंपामुळे ही यंत्रणा चालवायला लागणारी वीज नसल्याने ती बंद पडली. अशावेळी दुसरी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होते. डिझेल जनरेटर यंत्रणेद्वारे कुलंट यंत्रणा चालवली जाते. परंतु भूकंपानंतर आलेल्या सुनामीच्या लाटेमुळे ही जनरेटर यंत्रणा सुद्धा कोणताही इशारा न देता बंद पडली. अशावेळी तिसरी आपत्कालीन यंत्रणा असते ती म्हणजे रिऍक्टरमधल्या वाफेला थंड करण्यासाठी थेट पाण्याचा वापर केला जातो आणि रॉडचं तापमान कमी केलं जातं. परंतु पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यामुळे तिसरी आपत्कालीन यंत्रणा ही निकामी ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 05:46 PM IST

जपानपुढे किरणोत्सर्गाची समस्या

15 मार्च

भूकंप आणि सुनामीनंतर जपानपुढे सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली किरणोत्सर्गाची. फुकुशिमा दायाची अणुऊर्जा प्रकल्पात एका पाठोपाठ एक तिथल्या अणुभट्‌ट्यांमध्ये स्फोट होत आहे. यातून किरणोत्सर्गाचा धोका वाढला आहे.

जपानमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला तेव्हा अणुभट्टी सुरक्षितरित्या बंद करण्यासाठी पहिली यंत्रणा कार्यरत झाली. अणुभट्टीतील कंट्रोल रॉड अर्थात मॉडरेटर रॉड रिऍक्टरमध्ये सरकवणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. फ्युअल रॉड अद्यापही खूप गरम असल्याने त्यांना थंड करणारी कुलंट यंत्रणा मात्र आता योग्यरित्या काम करत नव्हती.भुकंपामुळे ही यंत्रणा चालवायला लागणारी वीज नसल्याने ती बंद पडली. अशावेळी दुसरी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होते. डिझेल जनरेटर यंत्रणेद्वारे कुलंट यंत्रणा चालवली जाते. परंतु भूकंपानंतर आलेल्या सुनामीच्या लाटेमुळे ही जनरेटर यंत्रणा सुद्धा कोणताही इशारा न देता बंद पडली.

अशावेळी तिसरी आपत्कालीन यंत्रणा असते ती म्हणजे रिऍक्टरमधल्या वाफेला थंड करण्यासाठी थेट पाण्याचा वापर केला जातो आणि रॉडचं तापमान कमी केलं जातं. परंतु पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यामुळे तिसरी आपत्कालीन यंत्रणा ही निकामी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close