S M L

जपानमध्ये रुग्णानी भरली हॉस्पिटल

15 मार्चजपानमध्ये आलेल्या भूकंप आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुनामीनंतर सरकारनं बचावकार्याला सुरुवात केली. बचाव पथकानं आतापर्यंत 15 हजार नागरिकांना वाचवण्यात यश मिळवलं आहे.पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या गाड्यांचं दृष्य बघायला जरा कठीण आहे. मात्र पुरात अडकलेल्या असंख्य कारनं कित्येकांचा बळी घेतला. तर काही आश्चर्यकारक बचावले आहे. इबाशी हा त्यापैकी एक. त्याच्यावर शिगोमा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुनामीच्या पुरात अबाशीची कार अडकल्यानंतर त्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला उशीर झाला होता. त्याने डाव्या हाताने गाडीची विंडो शिड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याच्या हाताला जखम झाली. तो कसाबसा कारबाहेर पडण्यात यशस्वी ठरला. यात इबाशीच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यानंतर काय झालं त्याला माहिती नाही. केवळ आपल्याला कुणीतरी ऍम्ब्युलन्समध्ये नेलं एवढंच त्याला आठवतंय. भूकंपानंतर शिगोमा शहरातील रुग्णालय पेशंटनी भरुन गेलं आहे. डॉ. टाकानूरी सुसाकी हे या हॉस्पिटलचे प्रमुख आहे. गुरुवारपासून ते हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून बसले आहे. आतापयंर्त या रुग्णालयात 600 जणांना दाखल करण्यात आलंय. त्यापैकी 13 रुग्ण दगावलेत तर 79 जणांवर उपचार सुरु आहेत. या भूकंपाने इबाशी यांचं जीवन उद्धवस्त झालंय. पण आता त्यांच्याकडे उरलंय ते केवळ त्यांच्या चेहर्‍यावरचे दुःख आणि कटू आठवणी विसरण्यासाठी चेहर्‍यावर दिसणारी हास्याची लकेर.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 06:04 PM IST

जपानमध्ये रुग्णानी भरली हॉस्पिटल

15 मार्च

जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुनामीनंतर सरकारनं बचावकार्याला सुरुवात केली. बचाव पथकानं आतापर्यंत 15 हजार नागरिकांना वाचवण्यात यश मिळवलं आहे.

पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या गाड्यांचं दृष्य बघायला जरा कठीण आहे. मात्र पुरात अडकलेल्या असंख्य कारनं कित्येकांचा बळी घेतला. तर काही आश्चर्यकारक बचावले आहे. इबाशी हा त्यापैकी एक. त्याच्यावर शिगोमा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुनामीच्या पुरात अबाशीची कार अडकल्यानंतर त्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला उशीर झाला होता. त्याने डाव्या हाताने गाडीची विंडो शिड फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याच्या हाताला जखम झाली. तो कसाबसा कारबाहेर पडण्यात यशस्वी ठरला. यात इबाशीच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यानंतर काय झालं त्याला माहिती नाही. केवळ आपल्याला कुणीतरी ऍम्ब्युलन्समध्ये नेलं एवढंच त्याला आठवतंय.

भूकंपानंतर शिगोमा शहरातील रुग्णालय पेशंटनी भरुन गेलं आहे. डॉ. टाकानूरी सुसाकी हे या हॉस्पिटलचे प्रमुख आहे. गुरुवारपासून ते हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून बसले आहे. आतापयंर्त या रुग्णालयात 600 जणांना दाखल करण्यात आलंय. त्यापैकी 13 रुग्ण दगावलेत तर 79 जणांवर उपचार सुरु आहेत. या भूकंपाने इबाशी यांचं जीवन उद्धवस्त झालंय. पण आता त्यांच्याकडे उरलंय ते केवळ त्यांच्या चेहर्‍यावरचे दुःख आणि कटू आठवणी विसरण्यासाठी चेहर्‍यावर दिसणारी हास्याची लकेर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close