S M L

ए राजा यांचे सहकारी सादिक बाच्छा यांचा गूढ मृत्यू

16 मार्चमाजी दूरसंचार मंत्री ए राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बाच्छा यांचा मृतदेह आज चेन्नईतल्या त्यांच्या घरी आढळला. आपल्या राहत्या घरात फास लावून बाच्छा यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या कंपन्यांमध्ये बाच्छा यांच्या ग्रीनहाऊस प्रमोटर्सचाही समावेश आहे. याप्रकरणी बाच्छा यांची सीबीआयनं एकदा चौकशीही केली होती. आज दुपारच्या विमानाने ते दिल्लीला सीबीआय चौकशीसाठी जाणार होते. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बाच्छा यांच्यावर कोणतंच दडपण नव्हतं, ते चौकशीत सहकार्य करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाच्छा यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करायला हवी अशी मागणी भाजप आणि जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. या घोटाळ्यातल्या चौकशीत महत्त्वाचे असणारे बाच्छा यांचा अचानक मृत्यू कसा झाला अशी शंका भाजपनं व्यक्त केली. पण बाच्छा यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही दोष देण्यात आलेला नाही. तामिळनाडू सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे.कोण होते सादिक बाच्छा ?- बाच्छा हे ग्रीनहाऊस प्रमोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते - डिसेंबर 2010 मध्ये ग्रीनहाऊस प्रमोटर्सवर सीबीआयचा छापा- राजा यांची पत्नी ग्रीनहाऊसमध्ये संचालक - बाच्छा हे राजा यांच्या पेरांबलूर या मतदारसंघातील रहिवासी - 2 जी घोटाळ्यातला पैसा खपवण्यासाठी बाच्छांनी ग्रीनहाऊसचा विस्तार केल्याचा आरोप - बाच्छा फेमाच्या स्कॅनरखाली होते

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 12:22 PM IST

ए राजा यांचे सहकारी सादिक बाच्छा यांचा गूढ मृत्यू

16 मार्च

माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बाच्छा यांचा मृतदेह आज चेन्नईतल्या त्यांच्या घरी आढळला. आपल्या राहत्या घरात फास लावून बाच्छा यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या कंपन्यांमध्ये बाच्छा यांच्या ग्रीनहाऊस प्रमोटर्सचाही समावेश आहे.

याप्रकरणी बाच्छा यांची सीबीआयनं एकदा चौकशीही केली होती. आज दुपारच्या विमानाने ते दिल्लीला सीबीआय चौकशीसाठी जाणार होते. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बाच्छा यांच्यावर कोणतंच दडपण नव्हतं, ते चौकशीत सहकार्य करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाच्छा यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करायला हवी अशी मागणी भाजप आणि जनता पक्षाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. या घोटाळ्यातल्या चौकशीत महत्त्वाचे असणारे बाच्छा यांचा अचानक मृत्यू कसा झाला अशी शंका भाजपनं व्यक्त केली. पण बाच्छा यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही दोष देण्यात आलेला नाही. तामिळनाडू सरकार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे.

कोण होते सादिक बाच्छा ?

- बाच्छा हे ग्रीनहाऊस प्रमोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते - डिसेंबर 2010 मध्ये ग्रीनहाऊस प्रमोटर्सवर सीबीआयचा छापा- राजा यांची पत्नी ग्रीनहाऊसमध्ये संचालक - बाच्छा हे राजा यांच्या पेरांबलूर या मतदारसंघातील रहिवासी - 2 जी घोटाळ्यातला पैसा खपवण्यासाठी बाच्छांनी ग्रीनहाऊसचा विस्तार केल्याचा आरोप - बाच्छा फेमाच्या स्कॅनरखाली होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close