S M L

निर्यात धोरणाविषयी सर्वपक्षीय खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

16 मार्चमहाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सर्वपक्षीय खासदारांनी सरकारच्या निर्यात धोरणाविषयी आज पंतप्रधानांची भेट घेतली. सरकारच्या निर्यात धोरणांचा फटका शेतकर्‍यांना बसतोय असं या खासदारांचं म्हणणं आहे. विशेषत: साखर, कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत आला असं निवेदन घेऊन हे खासदार पंतप्रधानांना भेटले. या निवेदनात साखरेची दरमहा 10 लाख मेट्रीक टन निर्यातीसाठी परवानगी द्यावी, कांद्याच्या निर्यातीत वाढ करून कांद्याची आयात थांबवावी, कापसाच्या 20 लाख गाठी निर्यातील परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसह सर्वपक्षीय खासदार पंतप्रधानांना भेटले. यावेळी पंतप्रधानांनी जो मंत्रीगट स्थापन केलेला आहे त्यांच्याकडे याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन या खासदारांना दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:49 AM IST

निर्यात धोरणाविषयी सर्वपक्षीय खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

16 मार्च

महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सर्वपक्षीय खासदारांनी सरकारच्या निर्यात धोरणाविषयी आज पंतप्रधानांची भेट घेतली. सरकारच्या निर्यात धोरणांचा फटका शेतकर्‍यांना बसतोय असं या खासदारांचं म्हणणं आहे. विशेषत: साखर, कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत आला असं निवेदन घेऊन हे खासदार पंतप्रधानांना भेटले.

या निवेदनात साखरेची दरमहा 10 लाख मेट्रीक टन निर्यातीसाठी परवानगी द्यावी, कांद्याच्या निर्यातीत वाढ करून कांद्याची आयात थांबवावी, कापसाच्या 20 लाख गाठी निर्यातील परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसह सर्वपक्षीय खासदार पंतप्रधानांना भेटले. यावेळी पंतप्रधानांनी जो मंत्रीगट स्थापन केलेला आहे त्यांच्याकडे याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन या खासदारांना दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close