S M L

शाळेच्या बसमधून पडून 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू

16 मार्चपुण्यात हडपसर इथं आज बसमधून पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचं नाव शिवेन गुप्ता असं आहे. शिवेन हा 'पवार पब्लिक स्कूल'चा विद्यार्थी होता. सीनिअर के जीचा हा विद्यार्थी होता. सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. ऍमनोरा टाऊनशीपमधील शाळेच्या जवळ बस पोचली होती. शिवेन बसच्या दारात उभा होता. बसचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे शिवेनचा तोल गेला. आणि शिवेनच्या अंगावरून बसचं चाक गेल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. हडपसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 03:24 PM IST

शाळेच्या बसमधून पडून 5 वर्षाचा मुलाचा मृत्यू

16 मार्च

पुण्यात हडपसर इथं आज बसमधून पडून 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचं नाव शिवेन गुप्ता असं आहे. शिवेन हा 'पवार पब्लिक स्कूल'चा विद्यार्थी होता. सीनिअर के जीचा हा विद्यार्थी होता. सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. ऍमनोरा टाऊनशीपमधील शाळेच्या जवळ बस पोचली होती. शिवेन बसच्या दारात उभा होता. बसचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे शिवेनचा तोल गेला. आणि शिवेनच्या अंगावरून बसचं चाक गेल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. हडपसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close