S M L

अच्युतानंदन यांना सीपीएमने दिला दणका

16 मार्चकेरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना त्यांच्याच पक्षानं मोठा धक्का दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत अच्युतानंदन यांना उमेदवारी द्यायला सीपीएमने नकार दिला आहे. आता अच्युतानंदन यांच्याऐवजी केरळचे गृहमंत्री कोडियारी बालकृष्णन राज्यातल्या लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटचं नेतृत्व करतील. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने अच्युतानंदन यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता. पण अच्युतानंदन यांची लोकप्रियता ध्यानात घेऊन नंतर हा निर्णय बदलण्यात आला होता. 87 वर्षांच्या अच्युतानंदन यांनी 2011 ची विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाची आज बैठक झाली. आणि अच्युतानंदन यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला. अच्युतानंदन यांचा अनेकदा पक्षाच्या नेतृत्वाशी संघर्ष झाला होता. त्यांच्यावर पॉलिटब्युरोनं निलंबनाची कारवाईसुद्धा केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 05:41 PM IST

अच्युतानंदन यांना सीपीएमने दिला दणका

16 मार्च

केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना त्यांच्याच पक्षानं मोठा धक्का दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत अच्युतानंदन यांना उमेदवारी द्यायला सीपीएमने नकार दिला आहे. आता अच्युतानंदन यांच्याऐवजी केरळचे गृहमंत्री कोडियारी बालकृष्णन राज्यातल्या लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटचं नेतृत्व करतील. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने अच्युतानंदन यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला होता.

पण अच्युतानंदन यांची लोकप्रियता ध्यानात घेऊन नंतर हा निर्णय बदलण्यात आला होता. 87 वर्षांच्या अच्युतानंदन यांनी 2011 ची विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाची आज बैठक झाली. आणि अच्युतानंदन यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेण्यात आला. अच्युतानंदन यांचा अनेकदा पक्षाच्या नेतृत्वाशी संघर्ष झाला होता. त्यांच्यावर पॉलिटब्युरोनं निलंबनाची कारवाईसुद्धा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close