S M L

अशोक चव्हाणांचं पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी

17 मार्चनांदेडच्या भाऊराव चव्हाण कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं पॅनल विजयी झाले आहे. आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. त्यातच एफआयआर मध्ये नाव आल्यामुळे चव्हाण आता काँग्रेस पक्षात एकाकी पडले आहेत. या परिस्थितीत अशोक चव्हाण यांच्यापुढे साखर कारखाना वाचवण्याचं आव्हान होतं. विरोधकही चव्हाणांना हादरा देण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र या निवडणुकीत चव्हाणांचे सर्वच्या सर्व 21 संचालक प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विरोधकांना या निवडणुकीत खातेही उघडता आलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 11:18 AM IST

अशोक चव्हाणांचं पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी

17 मार्च

नांदेडच्या भाऊराव चव्हाण कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं पॅनल विजयी झाले आहे. आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. त्यातच एफआयआर मध्ये नाव आल्यामुळे चव्हाण आता काँग्रेस पक्षात एकाकी पडले आहेत. या परिस्थितीत अशोक चव्हाण यांच्यापुढे साखर कारखाना वाचवण्याचं आव्हान होतं. विरोधकही चव्हाणांना हादरा देण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र या निवडणुकीत चव्हाणांचे सर्वच्या सर्व 21 संचालक प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विरोधकांना या निवडणुकीत खातेही उघडता आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close