S M L

खाजगी बस पुलावरून कोसळून 18 जण ठार

17 मार्चबुलढाणा जिल्हात लक्झरी बस पुलावरुन नदीच्या कोरड्या पात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 18 भाविक ठार झाले आहेत. मलकापूर - एदलाबाद दरम्यानच्या तांदुळवाडी पुलावर दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो रस्ता खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. या खड्यापासून बचाव करतांना ड्रायव्हरच गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि जवळपास 50 फूट खाली ही बस कोसळली. पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या या अपघातात 17 जण जागीच ठार झाले तर एकाजणाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेले सर्वच्या सर्व जण वर्धा जिल्हातील आर्वी, आष्टी तालुक्यातील रहिवासी असून मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे वय हे अंदाजे 40 वर्षांच्यावर आहे. जखमींवर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूर मुंबई हायवेवर हा अपघात घडला. नागपूर इथल्या विजयन ट्रॅव्हल्सची ही बस शिर्डीहून भाविकांना घेऊन शेगावला दर्शनासाठी जात होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 11:35 AM IST

खाजगी बस पुलावरून कोसळून 18 जण ठार

17 मार्च

बुलढाणा जिल्हात लक्झरी बस पुलावरुन नदीच्या कोरड्या पात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 18 भाविक ठार झाले आहेत. मलकापूर - एदलाबाद दरम्यानच्या तांदुळवाडी पुलावर दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो रस्ता खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहे. या खड्यापासून बचाव करतांना ड्रायव्हरच गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि जवळपास 50 फूट खाली ही बस कोसळली. पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या या अपघातात 17 जण जागीच ठार झाले तर एकाजणाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठार झालेले सर्वच्या सर्व जण वर्धा जिल्हातील आर्वी, आष्टी तालुक्यातील रहिवासी असून मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे वय हे अंदाजे 40 वर्षांच्यावर आहे. जखमींवर अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूर मुंबई हायवेवर हा अपघात घडला. नागपूर इथल्या विजयन ट्रॅव्हल्सची ही बस शिर्डीहून भाविकांना घेऊन शेगावला दर्शनासाठी जात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close