S M L

मनसेचे आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी विधानसभा तहकूब

17 मार्चमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणावरुन विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या केबीनमध्ये धाव घेवून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आर. आर. पाटील यांच्या निवेदनामुळे विरोधी पक्षाचे जराही समाधान झालेलं नाही त्यामुळे गोंधळ कायम होता. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र या ऐवजी 5 जेष्ठ सदस्यांची कमिटी नेमून चौकशी करावी आणि त्यानंतर कारवाई करावी असा प्रस्ताव सरकारतर्फे दिला गेला. मात्र विरोधकांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 12:12 PM IST

मनसेचे आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी विधानसभा तहकूब

17 मार्च

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणावरुन विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्याच्या केबीनमध्ये धाव घेवून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी आर. आर. पाटील यांच्या निवेदनामुळे विरोधी पक्षाचे जराही समाधान झालेलं नाही त्यामुळे गोंधळ कायम होता. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र या ऐवजी 5 जेष्ठ सदस्यांची कमिटी नेमून चौकशी करावी आणि त्यानंतर कारवाई करावी असा प्रस्ताव सरकारतर्फे दिला गेला. मात्र विरोधकांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close