S M L

आयबीएन लोकमतला 10 पुरस्कार

17 मार्चन्यूज अँड टेलिव्हिजन ऍवॉर्डस 2011 मध्ये आयबीएन लोकमतने दहा पुरस्कार मिळवून बाजी मारली. प्रथमच या पुरस्कार सोहळ्यात रिजनल कॅटेगरीत मराठीचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी आयबीएन लोकमतला घवघवीत यश मिळालंय. प्राईम टाईम बुलेटिनला बेस्ट पॉप्युलर न्यूज शो आणि बेस्ट प्राईम टाईम न्यूज शो असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. रिपोर्ताज या शोमधील 'आभाळ पेलताना' या लेहवर कोसळलेल्या आपत्तीवरील एपिसोडला बेस्ट डॉक्युमेंटरीचा ऍवार्ड मिळालाय. समाजप्रबोधन म्हणजेच सोशल डेव्लपमेंट कॅटेगरीमध्ये गर्जा महाराष्ट्रच्या भटके-विमुक्त या एपिसोडला पुरस्कार मिळाला आहे. 'चौफेर भरत' या भरत जाधवच्या स्पेशल इफेक्टचा वापर करुन केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला बेस्ट एंटरटेनमेंट फीचरचा पुरस्कार मिळाला आहे. रिपोर्टर विनय म्हात्रे यांनी केलेल्या 'जेएनपीटी टोलनाक्यावर' सुरु असलेल्या अवैध टोलवसुलीच्या कव्हरेजलाही बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्ट हा ऍवॉर्ड मिळालाय. आयबीएन लोकमत स्पेशल या कार्यक्रमात नागपूरजवळील बिब्बा फोडणार्‍या महिलांची व्था मांडणारा 'काळिमा माणुसकीला' या कार्यक्रमाला बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह फीचरचा ऍवॉर्ड मिळालाय.तर 'खेळासाठी सारं काही' या कार्यक्रमात जयश्री ठोके या कराटेपटूच्या व्यथेला वाचा फाडण्यात आली होती. या कार्यक्रमाला बेस्ट स्पोर्टस् फीचर ऍवॉर्ड मिळाला आहे. मराठी चॅनेलमधील बेस्ट प्रोमोचा पुरस्कारही आयबीएन लोकमतलाच मिळाला आहे. गणपती उत्सव साठी बनवलेल्या प्रोमोला बेस्ट प्रोमो कॅम्पेनचा ऍवॉर्ड मिळाला आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2014 03:49 PM IST

आयबीएन लोकमतला 10 पुरस्कार

17 मार्च

न्यूज अँड टेलिव्हिजन ऍवॉर्डस 2011 मध्ये आयबीएन लोकमतने दहा पुरस्कार मिळवून बाजी मारली. प्रथमच या पुरस्कार सोहळ्यात रिजनल कॅटेगरीत मराठीचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी आयबीएन लोकमतला घवघवीत यश मिळालंय. प्राईम टाईम बुलेटिनला बेस्ट पॉप्युलर न्यूज शो आणि बेस्ट प्राईम टाईम न्यूज शो असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

रिपोर्ताज या शोमधील 'आभाळ पेलताना' या लेहवर कोसळलेल्या आपत्तीवरील एपिसोडला बेस्ट डॉक्युमेंटरीचा ऍवार्ड मिळालाय. समाजप्रबोधन म्हणजेच सोशल डेव्लपमेंट कॅटेगरीमध्ये गर्जा महाराष्ट्रच्या भटके-विमुक्त या एपिसोडला पुरस्कार मिळाला आहे. 'चौफेर भरत' या भरत जाधवच्या स्पेशल इफेक्टचा वापर करुन केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला बेस्ट एंटरटेनमेंट फीचरचा पुरस्कार मिळाला आहे. रिपोर्टर विनय म्हात्रे यांनी केलेल्या 'जेएनपीटी टोलनाक्यावर' सुरु असलेल्या अवैध टोलवसुलीच्या कव्हरेजलाही बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्ट हा ऍवॉर्ड मिळालाय. आयबीएन लोकमत स्पेशल या कार्यक्रमात नागपूरजवळील बिब्बा फोडणार्‍या महिलांची व्था मांडणारा 'काळिमा माणुसकीला' या कार्यक्रमाला बेस्ट इन्व्हेस्टीगेटीव्ह फीचरचा ऍवॉर्ड मिळालाय.

तर 'खेळासाठी सारं काही' या कार्यक्रमात जयश्री ठोके या कराटेपटूच्या व्यथेला वाचा फाडण्यात आली होती. या कार्यक्रमाला बेस्ट स्पोर्टस् फीचर ऍवॉर्ड मिळाला आहे. मराठी चॅनेलमधील बेस्ट प्रोमोचा पुरस्कारही आयबीएन लोकमतलाच मिळाला आहे. गणपती उत्सव साठी बनवलेल्या प्रोमोला बेस्ट प्रोमो कॅम्पेनचा ऍवॉर्ड मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close