S M L

इंग्लंडची वेस्ट इंडिजवर 18 रन्सनं मात

17 मार्चवर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने आणखी एका धक्कादायक विजयाची नोंद केली. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या लढतीत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 18 रन्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने क्वार्टरफायनलसाठीचं आपलं आव्हानही कायम ठेवलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 243 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना वेस्ट इंडिजनं आक्रमक सुरुवात केली. ख्रिस गेलनं 21 बॉलमध्ये 43 रन्स केले. तर कॅप्टन डेरेन सॅमीनं 41 रन्सची आक्रमक खेळी केली. पण ही जोडी आऊट झाली आणि मॅच पुन्ह एकदा इंग्लंडच्या बाजूनं झुकली. इंग्लंडचे स्पीन बॉलर ट्रे़डवेल आणि स्वाननं मधली फळी झटपट गुडाळली. पण यानंतर ऑलराऊंडर अँद्रे रसेल मैदानावर आला आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. रसेलनं 3 सिक्स आणि 2 फोर मारत 49 रन्स केले. मात्र ट्रेडवेल पुन्हा टीमच्या मदतीला धावून आला. त्याने रसेलला आऊट करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 06:20 PM IST

इंग्लंडची वेस्ट इंडिजवर 18 रन्सनं मात

17 मार्च

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडने आणखी एका धक्कादायक विजयाची नोंद केली. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या लढतीत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 18 रन्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने क्वार्टरफायनलसाठीचं आपलं आव्हानही कायम ठेवलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 243 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना वेस्ट इंडिजनं आक्रमक सुरुवात केली. ख्रिस गेलनं 21 बॉलमध्ये 43 रन्स केले. तर कॅप्टन डेरेन सॅमीनं 41 रन्सची आक्रमक खेळी केली. पण ही जोडी आऊट झाली आणि मॅच पुन्ह एकदा इंग्लंडच्या बाजूनं झुकली. इंग्लंडचे स्पीन बॉलर ट्रे़डवेल आणि स्वाननं मधली फळी झटपट गुडाळली. पण यानंतर ऑलराऊंडर अँद्रे रसेल मैदानावर आला आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. रसेलनं 3 सिक्स आणि 2 फोर मारत 49 रन्स केले. मात्र ट्रेडवेल पुन्हा टीमच्या मदतीला धावून आला. त्याने रसेलला आऊट करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close