S M L

इमारती नीट ठेवा अन्यथा दंड भरा !

18 मार्चमुंबईसह राज्यातल्या सगळ्या शहरातील इमारतींबद्दल एक महत्त्वाचं विधेयक विधानसभेनं मंजूर केले आहे. या विधेयकामुळे ज्या इमारतीचा दर्शनी भाग नीटनेटका नसेल त्या इमारतींवर दंड आकारण्याचा अधिकार महानगरपालिका आणि नगरपालिकांना मिळणार आहे. अनेक शहरांमध्ये जुन्या इमारती आहेत. पण त्यांची डागडुजी होत नसल्यामुळे त्यांचे दर्शनी भाग नीटनेटके नसतात. इमारतींना चांगल्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारी इमारतीतल्या भाडेकरूंची किंवा मालकाची असेल असं या विधेयकात म्हटलं आहे. या विधेयकावर विरोधकांनी जोरदार टीका केली. सरकार या प्रकारची विधेयक आणण्याऐवजी पायाभूत सुविधा देत नाही. कारण तेराव्या वित्त आयोगानुसार केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी या सुधारणांची गरज आहे असा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. म्हाडा आणि सिडकोच्या इमारतींना मात्र यामधून वगळण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 06:00 PM IST

इमारती नीट ठेवा अन्यथा दंड भरा !

18 मार्च

मुंबईसह राज्यातल्या सगळ्या शहरातील इमारतींबद्दल एक महत्त्वाचं विधेयक विधानसभेनं मंजूर केले आहे. या विधेयकामुळे ज्या इमारतीचा दर्शनी भाग नीटनेटका नसेल त्या इमारतींवर दंड आकारण्याचा अधिकार महानगरपालिका आणि नगरपालिकांना मिळणार आहे. अनेक शहरांमध्ये जुन्या इमारती आहेत. पण त्यांची डागडुजी होत नसल्यामुळे त्यांचे दर्शनी भाग नीटनेटके नसतात.

इमारतींना चांगल्या स्थितीत ठेवण्याची जबाबदारी इमारतीतल्या भाडेकरूंची किंवा मालकाची असेल असं या विधेयकात म्हटलं आहे. या विधेयकावर विरोधकांनी जोरदार टीका केली. सरकार या प्रकारची विधेयक आणण्याऐवजी पायाभूत सुविधा देत नाही. कारण तेराव्या वित्त आयोगानुसार केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी या सुधारणांची गरज आहे असा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. म्हाडा आणि सिडकोच्या इमारतींना मात्र यामधून वगळण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close