S M L

गहू घोटाळा प्रकरणातील फरार नगरसेवकाला अटक

18 मार्चगहू घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. सांगलीतील बाबर मळ्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आलीय. सांगलीत गेल्या दोन महिन्यात बेकायदेशीर गव्हाचा साठा केलेल्या गोडावूनवर पोलिसांनी छापे घातले होते. यादरम्यान पोलिसांनी 400 पोती गहू जप्त केला होता. या दोन्ही प्रकरणी प्रमोद सुर्यवंशी याचं नाव पुढे आलं होतं. अप्पर पोलीस अधिक्षक बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 11:56 AM IST

गहू घोटाळा प्रकरणातील फरार नगरसेवकाला अटक

18 मार्च

गहू घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. सांगलीतील बाबर मळ्यात छापा टाकून ही कारवाई करण्यात आलीय. सांगलीत गेल्या दोन महिन्यात बेकायदेशीर गव्हाचा साठा केलेल्या गोडावूनवर पोलिसांनी छापे घातले होते. यादरम्यान पोलिसांनी 400 पोती गहू जप्त केला होता. या दोन्ही प्रकरणी प्रमोद सुर्यवंशी याचं नाव पुढे आलं होतं. अप्पर पोलीस अधिक्षक बाळासाहेब वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 11:56 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close