S M L

आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचे 20 दिवसांपासून उपोषण सुरूच

18 मार्चआदिवासी आश्रमशाळांच्या शंभर शिक्षकांनी गेल्या 20 दिवसापासून नाशिकमध्ये आदिवासी विकास आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गैरकारभाराच्या कारणावरून आदिवासी विकास खात्याने अनुदानित खाजगी आश्रमशाळा बंद केल्या. त्यामुळे या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. सर्व शिक्षकांना शासकीय आश्रमशाळांच्या सेवेत सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सामूहिक मुंडण केलं तरी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही. आज त्यांच्या उपोषणाला 20 दिवस उलटून गेले आहेत. त्यांच्यातील काही शिक्षकांची आता प्रकृती खालावली असून त्यांच्यावर नाशिकच्या सीव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 12:47 PM IST

आदिवासी आश्रमशाळांच्या शिक्षकांचे 20 दिवसांपासून उपोषण सुरूच

18 मार्च

आदिवासी आश्रमशाळांच्या शंभर शिक्षकांनी गेल्या 20 दिवसापासून नाशिकमध्ये आदिवासी विकास आयुक्तालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गैरकारभाराच्या कारणावरून आदिवासी विकास खात्याने अनुदानित खाजगी आश्रमशाळा बंद केल्या. त्यामुळे या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.

सर्व शिक्षकांना शासकीय आश्रमशाळांच्या सेवेत सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सामूहिक मुंडण केलं तरी त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही. आज त्यांच्या उपोषणाला 20 दिवस उलटून गेले आहेत. त्यांच्यातील काही शिक्षकांची आता प्रकृती खालावली असून त्यांच्यावर नाशिकच्या सीव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close