S M L

सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड

18 मार्चपाणीप्रश्नावरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी डोंबिवलीतील एमआयडीसी पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पाण्यावाचून नागरिक त्रस्त आहेत. यासाठी महापौर वैजयंती घोलप आणि सर्वपक्षीय नगरसेवक, एमआयडीसी पाणी खात्याचे अधिकारी विजय पणीकर यांची भेट घेण्यास गेले होते. पाण्याची अवाजवी बीलं कमी करावी, केडीएमसीला 10 एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे अशी सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी होती. ही मागणी अधिकार्‍यांनी फेटाळून लावली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी खात्याच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात महापौर वैजयंती घोलप यांच्या हाताला दुखापत झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 02:45 PM IST

सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड

18 मार्च

पाणीप्रश्नावरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी डोंबिवलीतील एमआयडीसी पाणी खात्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पाण्यावाचून नागरिक त्रस्त आहेत. यासाठी महापौर वैजयंती घोलप आणि सर्वपक्षीय नगरसेवक, एमआयडीसी पाणी खात्याचे अधिकारी विजय पणीकर यांची भेट घेण्यास गेले होते. पाण्याची अवाजवी बीलं कमी करावी, केडीएमसीला 10 एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे अशी सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी होती. ही मागणी अधिकार्‍यांनी फेटाळून लावली. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी खात्याच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात महापौर वैजयंती घोलप यांच्या हाताला दुखापत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close