S M L

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी अशोक सपकाळे

18 मार्चजळगाव महापालिकेच्या महापौरपदी अशोक सपकाळे तर उपमहापौरपदी राखी सोनवणे यांनी विजय मिळवला आहे. या दोघांनीही भाजप उमेदवारांचा 51 विरुद्ध 12 मतांनी पराभव केला. या निकालानं जळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा सुरेशदादा जैन यांचं वर्चस्व सिध्द झालं आहे. या निवडणुकीत निवडून आलेले महापौर अशोक सपकाळे यांना महापालिकेतील निरक्षर नगरसेवक म्हणून ओळखलं जातं. पण गेल्या 25 वर्षापासून सुरेशदादा यांचा कडवा समर्थक असल्याने सपकाळे यांना महापौरपदाचा मान मिळाल्याचं बोललं जातंय. पिठासीन अधिकारी ए आर बनसोडे यांनी घेतलेल्या खुल्या मतदान प्रक्रियेत या दोन्ही विजयी उमेदवारांना 52 तर भाजपचे पराभुत उमेदवार किशोर चौधरी आणि विजय गेही यांना अवघी 12 मते मिळाली. निकालानंतर विजयी उमेदवारांचंअभिनंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 04:23 PM IST

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी अशोक सपकाळे

18 मार्च

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी अशोक सपकाळे तर उपमहापौरपदी राखी सोनवणे यांनी विजय मिळवला आहे. या दोघांनीही भाजप उमेदवारांचा 51 विरुद्ध 12 मतांनी पराभव केला. या निकालानं जळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा सुरेशदादा जैन यांचं वर्चस्व सिध्द झालं आहे.

या निवडणुकीत निवडून आलेले महापौर अशोक सपकाळे यांना महापालिकेतील निरक्षर नगरसेवक म्हणून ओळखलं जातं. पण गेल्या 25 वर्षापासून सुरेशदादा यांचा कडवा समर्थक असल्याने सपकाळे यांना महापौरपदाचा मान मिळाल्याचं बोललं जातंय. पिठासीन अधिकारी ए आर बनसोडे यांनी घेतलेल्या खुल्या मतदान प्रक्रियेत या दोन्ही विजयी उमेदवारांना 52 तर भाजपचे पराभुत उमेदवार किशोर चौधरी आणि विजय गेही यांना अवघी 12 मते मिळाली. निकालानंतर विजयी उमेदवारांचंअभिनंदन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close