S M L

कार्तिकी एकादशीच्या पूजेवरून वारक-यांमध्येच पडले तट

07 नोव्हेंबर पंढरपूर,कार्तिकी एकादशी रविवारवर येऊन ठेपलीय आणि अजून या पूजेचा तिढा सुटलेला नाही. पूजेवरून आता वारक-यांमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. आर. आर. पाटील यांना महापूजा करू देणार नाही, अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे वारकरी फडकरी समितीचे हभप अध्यक्ष, महादेव महाराज शिवणीकर यांनी या पूजेसाठी उपमुख्यमंत्रीच आले पाहिजेत,असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेला वारक-यांनी विरोध करू नये म्हणून सरकार दबावतंत्राचा वापर करतंय, असा आरोप बंडातात्या कराडकर यांनी केलाय. वारक-याचं आंदोलन पेटू नये म्हणून पंढरपूरमध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. इकडे वारकरी शांत झाले नाहीत तर मी पूजेला जाणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतलाय. आता त्यांच्याऐवजी शासकीय महापूजा वनमंत्री बबनराव पाचपुते करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 02:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close