S M L

अच्युतानंदन यांना पुन्हा मिळणार तिकीट

18 मार्चकेरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचा आता विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यकर्त्यांच्या दबावानंतर सीपीएमला आपला निर्णय बदलावा लागला. अच्युतानंदन आता मालमपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय गेल्या बुधवारी सीपीएमच्या पॉलिटब्युरोनं घेतला होता. पण या निर्णयाविरोधात पक्षाच्या कॅडरनी राज्यभरात निदर्शनं केली. त्यामुळे पक्षाने माघार घेतली. 2006 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांना पहिल्यांदा तिकीट नाकारलं होतं. पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे नंतर त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 05:30 PM IST

अच्युतानंदन यांना पुन्हा मिळणार तिकीट

18 मार्च

केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचा आता विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यकर्त्यांच्या दबावानंतर सीपीएमला आपला निर्णय बदलावा लागला. अच्युतानंदन आता मालमपुरा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय गेल्या बुधवारी सीपीएमच्या पॉलिटब्युरोनं घेतला होता. पण या निर्णयाविरोधात पक्षाच्या कॅडरनी राज्यभरात निदर्शनं केली. त्यामुळे पक्षाने माघार घेतली. 2006 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांना पहिल्यांदा तिकीट नाकारलं होतं. पण कार्यकर्त्यांच्या दबावामुळे नंतर त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close