S M L

चंद्र आज पृथ्वीच्या जवळ येणार

19 मार्चखगोलप्रेमींना आज एक दुर्मिळ संधी अनुभवता येणार आहे. आज मध्यरात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. तब्बल 18 ते 19 वर्षांनंतर ही प्रक्रिया घडते. या प्रक्रियेत चंद्रबिंब तब्बल 14 टक्के मोठं दिसणार आहे. तसेच चंद्राची चमक 30 टक्के अधिक असेल. चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर आज 3 लाख 56 हजार 600 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. चंद्राच्या परिक्रमेच्या मार्गावर हे अंतर अवलंबून आहे. ही दुर्मिळ पर्वणी पाहण्यासाठी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं मत खगोल तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 09:45 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close