S M L

कोकणात शिमगो इलो !

19 मार्चफाल्गुन पंचमी ते पोर्णिमा म्हणजे कोकणवासियांसाठी वेगवेगळ्या सणांची धूमच. त्यातच होळी म्हणजे तर कोकणवासियांसाठी विशेषच. कोळी बांधव यानिमित्ताने आपापल्या होड्या सजवतात. इतकंच नव्हे तर होडीच्या किंवा बोटीच्या एका कोपर्‍याशी माशांची छोटीशी माळही लावतात. इतर दिवशी समुद्रावर, माशांसोबत आयुष्य घालवणारे कोळी बांधव यनिमित्ताने फुलांमध्ये नारळाच्या झाडांमध्ये रमतात. होळीच्या ठिकाणी फुलांची रांगोळी घातली जाते. होळीचा नेवैद्य बोटींवर नेला जातो आणि मग इतर वेळी समुद्राचा राजा असलेला हा नाखवा मग होळीसाठी काहीकाळ जमिनीवरही स्थिरावतो. सकाळभर होळीची तयारी करुन मग त्याची नजर लागते ती संध्याकाळच्या शिमग्यासाठी.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 11:33 AM IST

कोकणात शिमगो इलो !

19 मार्च

फाल्गुन पंचमी ते पोर्णिमा म्हणजे कोकणवासियांसाठी वेगवेगळ्या सणांची धूमच. त्यातच होळी म्हणजे तर कोकणवासियांसाठी विशेषच. कोळी बांधव यानिमित्ताने आपापल्या होड्या सजवतात. इतकंच नव्हे तर होडीच्या किंवा बोटीच्या एका कोपर्‍याशी माशांची छोटीशी माळही लावतात. इतर दिवशी समुद्रावर, माशांसोबत आयुष्य घालवणारे कोळी बांधव यनिमित्ताने फुलांमध्ये नारळाच्या झाडांमध्ये रमतात. होळीच्या ठिकाणी फुलांची रांगोळी घातली जाते. होळीचा नेवैद्य बोटींवर नेला जातो आणि मग इतर वेळी समुद्राचा राजा असलेला हा नाखवा मग होळीसाठी काहीकाळ जमिनीवरही स्थिरावतो. सकाळभर होळीची तयारी करुन मग त्याची नजर लागते ती संध्याकाळच्या शिमग्यासाठी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close