S M L

कोल्हापुर महापालिकेत कर प्रणालीला मंजुरी

19 मार्चभांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणीला कोल्हापुरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. पण शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या कर प्रणालीला अखेर मंजुरी देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीबाबात नागरिकामध्ये याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती. त्याचबरोबर या कर प्रणालीला नागरिकांनी तीव्र विरोध करत आंदोलनही केले होते. पण शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या कर प्रणालीला मंजुरी दिली. या कर प्रणालीला सेना-भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. तरीही बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाल्याने आता शहरात नव्याने करप्रणाली लागू होणार आहे. सध्याच्या करापेक्षा जास्त कराचा बोजा नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 12:19 PM IST

कोल्हापुर महापालिकेत कर प्रणालीला मंजुरी

19 मार्च

भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणीला कोल्हापुरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. पण शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या कर प्रणालीला अखेर मंजुरी देण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीबाबात नागरिकामध्ये याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती. त्याचबरोबर या कर प्रणालीला नागरिकांनी तीव्र विरोध करत आंदोलनही केले होते. पण शनिवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या कर प्रणालीला मंजुरी दिली. या कर प्रणालीला सेना-भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. तरीही बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाल्याने आता शहरात नव्याने करप्रणाली लागू होणार आहे. सध्याच्या करापेक्षा जास्त कराचा बोजा नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close