S M L

विंडीजला 269 धावांचे आव्हान

20 मार्चवर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान लीगमधील निर्णायक लढतीत भारताने पहिली बॅटिंग करत भारताने 268 धावांचा टप्पा गाठला. आणि विंडीजला 269 रन्सचं आव्हान दिलं आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात निराशजनक झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2 रन्स काढून आऊट झाला. त्या पाठोपाठ गौतम गंभीर ही 22 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने भारताची स्थिती सुधारली दोघांनी ही 122 धावांची पार्टनरशीप पूर्ण करत भारताला 150 धावांचा टप्पा पूर्ण करून दिली. विराट कोहली शानदार 59 रन्सवर आऊट झाला. कोहलीच्यानंतर आलेला भारतीय टीमचा कर्णधार 22 धावांवर आऊट झाला. पण युवराज सिंगनं शानदार सेंच्युरी ठोकली. तो 113 रन्सवर आऊट झाला. युवराजच्या आऊट झाल्यानंतर भारतीय टीमची घसरगुंडी सुरू झाली एका मागून एक खेळाडू धावा मोजण्याच्या नांदात आऊट होतं गेले परिणामी भारताने पूर्ण 50 ओव्हर ही खेळता आल्या नाही. या मॅचसाठी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले होते. दुखापतग्रस्त वीरेंद्र सेहवागऐवजी सुरेश रैनाला संधी देण्यात आली. तर पियुष चावलाऐवजी आर अश्विनला टीममध्ये खेळवण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 01:05 PM IST

विंडीजला 269 धावांचे आव्हान

20 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान लीगमधील निर्णायक लढतीत भारताने पहिली बॅटिंग करत भारताने 268 धावांचा टप्पा गाठला. आणि विंडीजला 269 रन्सचं आव्हान दिलं आहे.

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात निराशजनक झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2 रन्स काढून आऊट झाला. त्या पाठोपाठ गौतम गंभीर ही 22 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने भारताची स्थिती सुधारली दोघांनी ही 122 धावांची पार्टनरशीप पूर्ण करत भारताला 150 धावांचा टप्पा पूर्ण करून दिली. विराट कोहली शानदार 59 रन्सवर आऊट झाला.

कोहलीच्यानंतर आलेला भारतीय टीमचा कर्णधार 22 धावांवर आऊट झाला. पण युवराज सिंगनं शानदार सेंच्युरी ठोकली. तो 113 रन्सवर आऊट झाला. युवराजच्या आऊट झाल्यानंतर भारतीय टीमची घसरगुंडी सुरू झाली एका मागून एक खेळाडू धावा मोजण्याच्या नांदात आऊट होतं गेले परिणामी भारताने पूर्ण 50 ओव्हर ही खेळता आल्या नाही. या मॅचसाठी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले होते. दुखापतग्रस्त वीरेंद्र सेहवागऐवजी सुरेश रैनाला संधी देण्यात आली. तर पियुष चावलाऐवजी आर अश्विनला टीममध्ये खेळवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close