S M L

रत्नागिरीत भैरीची होळीला सुरूवात

20 मार्च रत्नागिरीची मुख्य होळी शेकडो ग्रामस्थ आणि मानकर्‍यांच्या उपस्थितीत आज वाजतगाजत उभी राहिली. भैरीची होळी म्हणून ही होळी ओळखली जाते. सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीचं सूरमाडाचं झाड होळी म्हणून उभं केलं जातं. होळी तोडून आणल्यानंतर तिला पानाफुलांनी सजवली जाते आणि नारळाचं तोरण बांधून आणि ध्वज लावून उभी केली जाते. रविवारपासून गुडीपाडव्यापर्यंत रोज या ठिकाणी कोकणातील पारंपरिक लोककलांचा जागर केला जाणार असून गावागावातील अनेक पालख्याही या होळीला भेट देणार आहेत. यावर्षी होळीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पुढचे पंधरा दिवस कोकणात शिमग्याचा उत्साह वाढत जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 02:45 PM IST

रत्नागिरीत भैरीची होळीला सुरूवात

20 मार्च

रत्नागिरीची मुख्य होळी शेकडो ग्रामस्थ आणि मानकर्‍यांच्या उपस्थितीत आज वाजतगाजत उभी राहिली. भैरीची होळी म्हणून ही होळी ओळखली जाते. सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीचं सूरमाडाचं झाड होळी म्हणून उभं केलं जातं. होळी तोडून आणल्यानंतर तिला पानाफुलांनी सजवली जाते आणि नारळाचं तोरण बांधून आणि ध्वज लावून उभी केली जाते. रविवारपासून गुडीपाडव्यापर्यंत रोज या ठिकाणी कोकणातील पारंपरिक लोककलांचा जागर केला जाणार असून गावागावातील अनेक पालख्याही या होळीला भेट देणार आहेत. यावर्षी होळीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पुढचे पंधरा दिवस कोकणात शिमग्याचा उत्साह वाढत जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close