S M L

मॅथ्यू हेडन फावल्यावेळेत घेतोय रेसिपीचे धडे

07 नोव्हेंबर नागपूर,भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची चौथी आणि शेवटची टेस्ट सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. मॅचचा त्या दिवसभराचा खेळ संपला की पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीममधले काही खेळाडू हॉटेलमध्ये टीव्ही पाहत टाईमपास करतात तर काही खेळाडू शॉपिंगची मजा लुटतात. पण ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर मॅथ्यू हेडन फावल्यावेळेत काय करतो हे तुम्हाला माहित आहे... मॅच संपल्या संपल्या मॅथ्यू हेडनचे पाय वळतात ते तो रहात असलेल्या हॉटेलच्या किचनमध्ये. यावरून नागपुरात टेस्ट खेळायला आलेल्या हेडनला भारतीय पदार्थांची टेस्ट खूपच आवडलेली आहे असंच दिसतंय. तसंच हेडनला भारतीय पदार्थ तयार करण्याची आवड आहे. हेडनला किचनमध्ये पाहून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. ज्या पध्दतीनं तो बॅटींग करतांना प्रत्येक बॉलचा अभ्यास करतो. त्याचप्रमाणे तो लज्जतदार पदार्थ बनवतानाही प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत होता. म्हणूनच हेडनला भारतीय पदार्थ शिकवणा-या हॉटेल प्राईडचे मुख्य शेफ, सुनील वाघ यांना तो एक उत्तम शेफ बनू शकतो याबद्दल काहीच शंका वाटत नाही .

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 05:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close