S M L

सोलापूरमध्ये दगडफेक होळी

20 मार्चसोलापूर जिल्ह्यातील भोयरे पंचक्रोशीत गावकरी परस्परांना दगड मारत धुळवड साजरी करतात. रक्त सांडेपर्यंत साजर्‍या केल्या जाणार्‍या या जिवघेण्या होळीकडे अंधश्रध्दा निर्मुलन आणि प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. उलट याला पोलीस संरक्षण दिलं जातं. दरवर्षी होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच रंगपंचमीला दगडफेक धुळवड साजरी केली जाते. मोहळ तालुक्यातील भोयरे या गावी गावदेवी अंबेजोगाई आणि दैत्याच्या युध्दाचे प्रतिक म्हणून परस्परावर दगडफेक करीत धुळवड साजरी केली जाते. दोन गटात डोके फुटेपर्यंत दगडफेक केला जातो. पण कोणावरही औषध उपचार केला जात नाही. गावदेवीचा अंगारा जखमेवर लावला जातो. या होळीत रक्त सांडले तरच पाऊस पडतो नाहीतर दुष्काळाची भिती असते असं गावकर्‍यांच मानणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 20, 2011 03:01 PM IST

सोलापूरमध्ये दगडफेक होळी

20 मार्च

सोलापूर जिल्ह्यातील भोयरे पंचक्रोशीत गावकरी परस्परांना दगड मारत धुळवड साजरी करतात. रक्त सांडेपर्यंत साजर्‍या केल्या जाणार्‍या या जिवघेण्या होळीकडे अंधश्रध्दा निर्मुलन आणि प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. उलट याला पोलीस संरक्षण दिलं जातं. दरवर्षी होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच रंगपंचमीला दगडफेक धुळवड साजरी केली जाते.

मोहळ तालुक्यातील भोयरे या गावी गावदेवी अंबेजोगाई आणि दैत्याच्या युध्दाचे प्रतिक म्हणून परस्परावर दगडफेक करीत धुळवड साजरी केली जाते. दोन गटात डोके फुटेपर्यंत दगडफेक केला जातो. पण कोणावरही औषध उपचार केला जात नाही. गावदेवीचा अंगारा जखमेवर लावला जातो. या होळीत रक्त सांडले तरच पाऊस पडतो नाहीतर दुष्काळाची भिती असते असं गावकर्‍यांच मानणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close