S M L

हा खेळ बाहुल्यांचा...

शची मराठे, मुंबई21 मार्चराजस्थानी कळसुत्री बाहुल्या संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जवळपास तेवढीच 500-600 वर्षांची परंपरा असलेल्या सिंधूदुर्ग जिल्हातील पिंगुळी गावच्या आदिवासी बाहुल्यादेखील आता कात टाकत आहेत. पिंगुळीच्या ठाकरं या आदिवासी समाजाची पारंपारिक कळसूत्री बाहुल्यांची कला. आता गावची वेस ओलांडून मुंबईपर्यंत येऊन पोहचली आहे. आणि या बाहुलांचे बाहुलीकार आहेत गणपत म्हस्के. गणपत म्हस्के म्हणाले की, पूर्वी माणसं लिहून ठेवीत नसतं. आता माझी 6 वी पिढी. आणि माझ्या मुलाची 7 वी पिढी हा खेळ करत आहे. ही कला 500 - 600 वर्ष जूनी आहे.या कलेचे वैशिष्टय म्हणजे गणपती, रिद्धी-सिद्धी, रामायण, महाभारतातील लाकडी पात्रांचा तबलजी, झांजवाला अशा साथीनं रंगलेला खेळ. सुतारकाम, शिंपीकाम, रंगकाम असे सगळे अवगत असावे लागते. कारण जो सादर करतो त्यालाच त्याच्या डोक्यात ती बाहुली कशी दिसते ते असते त्यामुळे त्याला सुतारकाम, शिंपीकाम, पेंटिंग आणि बाहुलीकार अशा 5-6 भूमिका पार पाडाव्या लागतात. तेव्हा बाहुलीकाराचा खेळ लोकांसमोर येतो. रात्र रात्र चालणार्‍या या खेळाचे पूर्वीचे दिवस आता पालटलेत. मात्र या कलेतील कौशल्य मात्र आजदेखील तसेच आहे.बाहुली नाचवणारा हा बाहुलीइतकाचं लवचिक हवा. बाहुल्या या निर्जीव असतात, मात्र तो त्यांचा निर्जिवता ही सजीवांपर्यंत पोहचवायची असते. आणि त्यासाठीच गणपत म्हस्केंच्या सातव्या पिढीतला शिवराम या कलेसाठी झटतोय. कळसूत्री बाहुली कलाकार शिवदास म्हस्के म्हणतात, आत्ता ही बाहुली दिसतेय तेवढी आधी नव्हती. मग स्टेजवरुन शोज करायचे म्हणजे बाहुली मोठी हवी. काही कर्नाटक, राजस्थानच्या कलाकारांचे काम पाहिले. आणि आपली बाहुली बदलली. छान कपडे, माळा वगैरे घातल्या. आता जो स्टेज आहे त्यापेक्षा मोठे बांधायचा आहे. माझ्या आजोबांनी, वडिलांनी याचं बाहुल्यांचा आधार घेतला पोटापाण्यासाठी. आता त्यांना माझ्या आधाराची गरज आहे कळसुत्री बाहुल्यांचे हे जग शिवरामला खर्‍या अर्थाने जगभर पोहचवायचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 12:48 PM IST

हा खेळ बाहुल्यांचा...

शची मराठे, मुंबई

21 मार्च

राजस्थानी कळसुत्री बाहुल्या संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. जवळपास तेवढीच 500-600 वर्षांची परंपरा असलेल्या सिंधूदुर्ग जिल्हातील पिंगुळी गावच्या आदिवासी बाहुल्यादेखील आता कात टाकत आहेत.

पिंगुळीच्या ठाकरं या आदिवासी समाजाची पारंपारिक कळसूत्री बाहुल्यांची कला. आता गावची वेस ओलांडून मुंबईपर्यंत येऊन पोहचली आहे. आणि या बाहुलांचे बाहुलीकार आहेत गणपत म्हस्के. गणपत म्हस्के म्हणाले की, पूर्वी माणसं लिहून ठेवीत नसतं. आता माझी 6 वी पिढी. आणि माझ्या मुलाची 7 वी पिढी हा खेळ करत आहे. ही कला 500 - 600 वर्ष जूनी आहे.

या कलेचे वैशिष्टय म्हणजे गणपती, रिद्धी-सिद्धी, रामायण, महाभारतातील लाकडी पात्रांचा तबलजी, झांजवाला अशा साथीनं रंगलेला खेळ. सुतारकाम, शिंपीकाम, रंगकाम असे सगळे अवगत असावे लागते. कारण जो सादर करतो त्यालाच त्याच्या डोक्यात ती बाहुली कशी दिसते ते असते त्यामुळे त्याला सुतारकाम, शिंपीकाम, पेंटिंग आणि बाहुलीकार अशा 5-6 भूमिका पार पाडाव्या लागतात. तेव्हा बाहुलीकाराचा खेळ लोकांसमोर येतो. रात्र रात्र चालणार्‍या या खेळाचे पूर्वीचे दिवस आता पालटलेत. मात्र या कलेतील कौशल्य मात्र आजदेखील तसेच आहे.

बाहुली नाचवणारा हा बाहुलीइतकाचं लवचिक हवा. बाहुल्या या निर्जीव असतात, मात्र तो त्यांचा निर्जिवता ही सजीवांपर्यंत पोहचवायची असते. आणि त्यासाठीच गणपत म्हस्केंच्या सातव्या पिढीतला शिवराम या कलेसाठी झटतोय. कळसूत्री बाहुली कलाकार शिवदास म्हस्के म्हणतात, आत्ता ही बाहुली दिसतेय तेवढी आधी नव्हती. मग स्टेजवरुन शोज करायचे म्हणजे बाहुली मोठी हवी. काही कर्नाटक, राजस्थानच्या कलाकारांचे काम पाहिले. आणि आपली बाहुली बदलली. छान कपडे, माळा वगैरे घातल्या. आता जो स्टेज आहे त्यापेक्षा मोठे बांधायचा आहे. माझ्या आजोबांनी, वडिलांनी याचं बाहुल्यांचा आधार घेतला पोटापाण्यासाठी. आता त्यांना माझ्या आधाराची गरज आहे कळसुत्री बाहुल्यांचे हे जग शिवरामला खर्‍या अर्थाने जगभर पोहचवायचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close