S M L

मराठी साहित्यातील जंगल..

राहुल विळदकर, मुंबई21 मार्च''काटेसावरीच्या बोंडातली म्हातारी जितकी अलगद जाते, तितक्या हळूवारपणे माझा हा प्रवास होतो.'' मराठी साहित्यातील अशी वाक्य समोर आली की जाणवत ते जंगलविश्वाचे मराठी ललितात बेमालूम मिसळून जाणे. 70 च्या दशकातं याच्या पायवाट्या दिसल्या. आणि आता त्याचा राजमार्ग झाले आहे. मंतरलेल्या चैत्रबनातून हळूवार झुळूक यावी असे हे ललित लेखन. त्यामुळेच 1974 च्या सप्टेंबरमध्ये शुद्ध वनांचा, जंगलविश्वाची अनूभूती देणारा मारुती चितमपल्लींचा लेख प्रसिद्ध झाला. आणि असं पण साहित्य असू शकते याची जाणीव मराठी रसिकांना झाली. मग त्यांच्याबरोबर व्यंकटेश माडगूळकर, नंतर किरण पुरंदरे, अधूनमधून इकडेही डोकावणारे गो. नी. दांडेकर यांनी यात सुवर्ण मोलाचीच भर घातली. केवळ एवढचं नाही, तर जंगलात सापडणार्‍या पक्षी, प्राणी, झाडं, फुलं अगदी तलावं, वनराया यांनाही खास मातीचा सुगंध असणारी नावे शोधून काढली आणि ती साहित्यात चितारली सुद्धा. अगदी दुर्गा भागवतांनाही मग ऋतुरंग लिहिल्यावाचून राहवले नाही. मारुती चितमपल्ली म्हणतात की, नदी वळसा घेऊन वाहत होती. पुढच्या वळणावर बांबूच्या मोरपिशी रांजी पाण्याला स्पर्श करत होत्या. कुठं कारी, कुठं फणस-आंबा, कुठं जांभूळ -पिसा , कुठं नागकेसर तर कुठं टून-धूप. वृक्षांवर इतके शेवाळ की वाटे त्यांना दाढ्या आल्यायत. बुंध्यांना पाखी आलेल्या. वाटायचं वृक्ष उडायच्या तयारीत आहेत.गोनी दांडेकर म्हणतात की, तळांत घनदाट झाडी. लवणाच्या खोलवणातून मावळतीला वाहणारा वहाळ. दोन्ही बाजवा झाडीन गच्च झाकलेल्या. झाडोरा असा जहाँबाज की एवढा नारायण वर कळाकळा तापायचा. पण फद्याएवढ उन्ह काही तळाच्या पाचोळ्यात उतरायचे नाही.तर व्यंकटेश माडगूळकरांना वाटते, माणूस देवपुत्र कसला, तो तर निसर्गपुत्रंच आहे. चाळीच्या खुराड्यात राहूनही, तो गॅलरीत दोन कुंड्या जोपासतो आणि उशीच्या आभर्‍यावर पान-फुले विणतो. असं हे निसर्ग साहित्याचं लेणं. त्याची ताकदही एवढी की मराठी साहित्य रसिकांनी अवघं आयुष्य राना-वनात वेचलेल्या मारुती चितमपल्लींना थेट मराठी साहित्य संमेलनाचाच अध्यक्ष केले. शहरी जीवनात सध्या असते नुसती धावाधाव. कधी अंगावर चांदण पडत नाही, की कधी कुठल्या खळाळत्या ओढ्यात मनसोक्त डुंबता येत नाही. त्यामुळेच साहित्यातली ही वन- ललित आपल्यासाठी थंडगार शिडकावाच ठरतात. आपल्या जंगलातील दिवस या पुस्तकात माडगूळकर म्हणतात. " जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्याने निसर्गाची भव्यता, श्रीमंती आणि सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरचं आहे."

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 01:05 PM IST

मराठी साहित्यातील जंगल..

राहुल विळदकर, मुंबई

21 मार्च

''काटेसावरीच्या बोंडातली म्हातारी जितकी अलगद जाते, तितक्या हळूवारपणे माझा हा प्रवास होतो.'' मराठी साहित्यातील अशी वाक्य समोर आली की जाणवत ते जंगलविश्वाचे मराठी ललितात बेमालूम मिसळून जाणे. 70 च्या दशकातं याच्या पायवाट्या दिसल्या. आणि आता त्याचा राजमार्ग झाले आहे.

मंतरलेल्या चैत्रबनातून हळूवार झुळूक यावी असे हे ललित लेखन. त्यामुळेच 1974 च्या सप्टेंबरमध्ये शुद्ध वनांचा, जंगलविश्वाची अनूभूती देणारा मारुती चितमपल्लींचा लेख प्रसिद्ध झाला. आणि असं पण साहित्य असू शकते याची जाणीव मराठी रसिकांना झाली. मग त्यांच्याबरोबर व्यंकटेश माडगूळकर, नंतर किरण पुरंदरे, अधूनमधून इकडेही डोकावणारे गो. नी. दांडेकर यांनी यात सुवर्ण मोलाचीच भर घातली. केवळ एवढचं नाही, तर जंगलात सापडणार्‍या पक्षी, प्राणी, झाडं, फुलं अगदी तलावं, वनराया यांनाही खास मातीचा सुगंध असणारी नावे शोधून काढली आणि ती साहित्यात चितारली सुद्धा. अगदी दुर्गा भागवतांनाही मग ऋतुरंग लिहिल्यावाचून राहवले नाही.

मारुती चितमपल्ली म्हणतात की, नदी वळसा घेऊन वाहत होती. पुढच्या वळणावर बांबूच्या मोरपिशी रांजी पाण्याला स्पर्श करत होत्या. कुठं कारी, कुठं फणस-आंबा, कुठं जांभूळ -पिसा , कुठं नागकेसर तर कुठं टून-धूप. वृक्षांवर इतके शेवाळ की वाटे त्यांना दाढ्या आल्यायत. बुंध्यांना पाखी आलेल्या. वाटायचं वृक्ष उडायच्या तयारीत आहेत.

गोनी दांडेकर म्हणतात की, तळांत घनदाट झाडी. लवणाच्या खोलवणातून मावळतीला वाहणारा वहाळ. दोन्ही बाजवा झाडीन गच्च झाकलेल्या. झाडोरा असा जहाँबाज की एवढा नारायण वर कळाकळा तापायचा. पण फद्याएवढ उन्ह काही तळाच्या पाचोळ्यात उतरायचे नाही.

तर व्यंकटेश माडगूळकरांना वाटते, माणूस देवपुत्र कसला, तो तर निसर्गपुत्रंच आहे. चाळीच्या खुराड्यात राहूनही, तो गॅलरीत दोन कुंड्या जोपासतो आणि उशीच्या आभर्‍यावर पान-फुले विणतो.

असं हे निसर्ग साहित्याचं लेणं. त्याची ताकदही एवढी की मराठी साहित्य रसिकांनी अवघं आयुष्य राना-वनात वेचलेल्या मारुती चितमपल्लींना थेट मराठी साहित्य संमेलनाचाच अध्यक्ष केले. शहरी जीवनात सध्या असते नुसती धावाधाव. कधी अंगावर चांदण पडत नाही, की कधी कुठल्या खळाळत्या ओढ्यात मनसोक्त डुंबता येत नाही. त्यामुळेच साहित्यातली ही वन- ललित आपल्यासाठी थंडगार शिडकावाच ठरतात.

आपल्या जंगलातील दिवस या पुस्तकात माडगूळकर म्हणतात. " जंगलांतल्या दिवसांच्या या कहाण्या वाचून कुणी वाचक रानभैरी झाला आणि त्याने निसर्गाची भव्यता, श्रीमंती आणि सौंदर्य यांचा आनंद घेतला, तर बरचं आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close