S M L

फुकुशिमा प्रकल्पाजवळ धोका कायम

21 मार्चफुकुशिमा दायची अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणच्या धोका अजूनही कायम आहे. त्यातच आता फुकुशिमा आणि परिसरातल्या दूध आणि भाजीपाल्यांमध्ये किरणोत्सारी पदार्थांचे अंश आढळून आलेत. पाण्यात रेडिओऍक्टीव्ह आयोडीनचं प्रमाण वाढल्यामुळे उघड्यावरचं पाणी पिऊ नका असा इशारा जपान सरकारने तेथील नागरिकांना दिला आहे. पण इतर भागात किरणोत्सर्गाचा धोका फारसा नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, फुकुशिमातील रिऍक्टर नंबर 2 आणि 3 मधून आज धूर निघाल्याचं दिसून आलं. याचं कारण अजून समजलं नसल्याचं जपानच्या अणुसुरक्षा संस्थेनं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2011 06:00 PM IST

फुकुशिमा प्रकल्पाजवळ धोका कायम

21 मार्च

फुकुशिमा दायची अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणच्या धोका अजूनही कायम आहे. त्यातच आता फुकुशिमा आणि परिसरातल्या दूध आणि भाजीपाल्यांमध्ये किरणोत्सारी पदार्थांचे अंश आढळून आलेत. पाण्यात रेडिओऍक्टीव्ह आयोडीनचं प्रमाण वाढल्यामुळे उघड्यावरचं पाणी पिऊ नका असा इशारा जपान सरकारने तेथील नागरिकांना दिला आहे. पण इतर भागात किरणोत्सर्गाचा धोका फारसा नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, फुकुशिमातील रिऍक्टर नंबर 2 आणि 3 मधून आज धूर निघाल्याचं दिसून आलं. याचं कारण अजून समजलं नसल्याचं जपानच्या अणुसुरक्षा संस्थेनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close