S M L

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उत्तरपत्रिका बेवारस स्थितीत पडून

22 मार्चराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका औरंगाबाद रेल्वेस्थानकावर अक्षरश: बेवारस अवस्थेत पडून आहेत. त्यापैकी काही गठ्यांची पोतीही उसवलेली आहेत. पार्किंगच्या ठिकाणी या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेले असल्यामुळे शिक्षण विभाग किती उदासीन आहे, हेच यावरून स्पष्ट होतं. पार्किंगच्या जागेवर उघड्यावर असलेले हे गठ्ठे चोरीला गेले तर जबाबदारी कुणाची याचे उत्तर शिक्षण विभागाकडे कदाचित असेल. ते पोस्टावर याची जबाबदारी ढकलतील. पण पोस्टात टाकलेल्या उत्तरपत्रिकांचे हे गठ्ठे आठवडाभरापासून पडून राहिलेले आहेत हे माहित होऊनही शिक्षण मंडळाने कोणतेही पाऊल उचलले नाहीत. विशेष म्हणजे उत्तरपत्रिकांना कोणतीही सुरक्षितता नाही. सध्या या पोस्टातून इतर टपाल नेण्यासाठी वाहन आलेले आहेत. पण उत्तरपत्रिका पाठविण्यासाठी कोणतीही तजवीज अजून तरी केलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 10:01 AM IST

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उत्तरपत्रिका बेवारस स्थितीत पडून

22 मार्चराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका औरंगाबाद रेल्वेस्थानकावर अक्षरश: बेवारस अवस्थेत पडून आहेत. त्यापैकी काही गठ्यांची पोतीही उसवलेली आहेत. पार्किंगच्या ठिकाणी या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेले असल्यामुळे शिक्षण विभाग किती उदासीन आहे, हेच यावरून स्पष्ट होतं.

पार्किंगच्या जागेवर उघड्यावर असलेले हे गठ्ठे चोरीला गेले तर जबाबदारी कुणाची याचे उत्तर शिक्षण विभागाकडे कदाचित असेल. ते पोस्टावर याची जबाबदारी ढकलतील. पण पोस्टात टाकलेल्या उत्तरपत्रिकांचे हे गठ्ठे आठवडाभरापासून पडून राहिलेले आहेत हे माहित होऊनही शिक्षण मंडळाने कोणतेही पाऊल उचलले नाहीत. विशेष म्हणजे उत्तरपत्रिकांना कोणतीही सुरक्षितता नाही. सध्या या पोस्टातून इतर टपाल नेण्यासाठी वाहन आलेले आहेत. पण उत्तरपत्रिका पाठविण्यासाठी कोणतीही तजवीज अजून तरी केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close