S M L

मोनिका खून प्रकरणी 12व्या दिवशीही मारेकरी मोकाट

22 मार्चनागपूरमध्ये 11 मार्च ला केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून झाला. या घटनेला 12 दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाहीय. त्यामुळे नागपूरमध्ये विलक्षण संतापाचे वातावरण निर्माण झालंय. 11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चॉपरने वार करुन तिची हत्या केली. पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या 7 टीम्स मिळूनही मोनिकाच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यात यश मिळवू शकलेल्या नाहीत. ही घटना पाहिलेले अनेकजण आहेत. पण त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही. त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. आता मोनिकाचे आई वडील स्वतःच नागपूरकरांना पुढं येण्याचं आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाही असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 10:27 AM IST

मोनिका खून प्रकरणी 12व्या दिवशीही मारेकरी मोकाट

22 मार्च

नागपूरमध्ये 11 मार्च ला केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून झाला. या घटनेला 12 दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाहीय. त्यामुळे नागपूरमध्ये विलक्षण संतापाचे वातावरण निर्माण झालंय. 11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चॉपरने वार करुन तिची हत्या केली. पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या 7 टीम्स मिळूनही मोनिकाच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यात यश मिळवू शकलेल्या नाहीत. ही घटना पाहिलेले अनेकजण आहेत. पण त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही.

त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. आता मोनिकाचे आई वडील स्वतःच नागपूरकरांना पुढं येण्याचं आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाही असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close