S M L

संसदेत दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ

22 मार्चसंसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज कोणत्या विषयावर आधी चर्चा करायची यावरून गदारोळ झाला.आधी बजेट विधेयकावर चर्चा व्हावी असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं. तर कॅश फॉर व्होटच्या मुद्यावर आधी अडीच तासांची छोटी चर्चा होऊ दे असा आग्रह विरोधकांनी धरला होता. पंतप्रधान कॅश फॉर व्होटच्या मुद्यावर सभागृहाची दिशाभूल करत आहे असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली. जर हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर नियम 176 अंतर्गत छोटी चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली. लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांनी सुषमा स्वराज यांना याबाबत पाठवलेल्या नोटीशीवर विचार होईल असं सांगितल्यावर गदारोळ सुरू झाला. कोणत्या मुद्यावर आधी चर्चा करायची याबद्दल सभागृहात एकमत होत नव्हतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 10:53 AM IST

संसदेत दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ

22 मार्च

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज कोणत्या विषयावर आधी चर्चा करायची यावरून गदारोळ झाला.आधी बजेट विधेयकावर चर्चा व्हावी असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं. तर कॅश फॉर व्होटच्या मुद्यावर आधी अडीच तासांची छोटी चर्चा होऊ दे असा आग्रह विरोधकांनी धरला होता. पंतप्रधान कॅश फॉर व्होटच्या मुद्यावर सभागृहाची दिशाभूल करत आहे असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली.

जर हा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर नियम 176 अंतर्गत छोटी चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली. लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांनी सुषमा स्वराज यांना याबाबत पाठवलेल्या नोटीशीवर विचार होईल असं सांगितल्यावर गदारोळ सुरू झाला. कोणत्या मुद्यावर आधी चर्चा करायची याबद्दल सभागृहात एकमत होत नव्हतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close