S M L

वाई होत आहे कॅमेर्‍यात बंद

अमोल परचुरे, मुंबई 22 मार्च वाई हे मुळात थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण सध्या वाईत थंड हवेबरोबरच फिल्मी शूटिंगचेही वारे वाहू लागले आहेत. वाईत उमेश आणि गिरीश कुलकर्णीच्या देऊळ या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी देऊळमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी वाईत तळ ठोकून आहेत.स्वदेस,अपहरण, राजनिती या हिट सिनेमात कथेबरोबरच एका ठिकाणाचेही महत्व होते. ते ठिकाण म्हणजे या सिनेमात दिसलेले निसर्गरम्य वाई. या वाईमध्येच आणि स्वदेसमध्ये दाखवलेल्या वाड्यातच सध्या देऊळ सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. तेव्हा शाहरूखचे वास्तव्य मिळालेल्या या वाड्याला आता नाना पाटेकरांमुळे अजून रंगत आलीय. वाईत आत्तापर्यंत तीन सिनेमांचे शूटिंग करणारे नाना पाटेकरही वाईच्या खूप प्रेमात आहे.वाईला खर्‍या अर्थाने सिनेमात घेऊन आले दिग्दर्शक प्रकाश झा. त्यांनी आपल्या सिनेमातून उत्तर भारतीय संस्कृती दाखवली खरी पण त्याचं शूटिंग करण्यासाठी त्यांना वाईच्या आसपासचा भागच पसंत पडला . सध्याच्या दिग्दर्शकांनाही वाईचा हाच भाग आपल्या कॅमेर्‍यात टिपायचा आहे.नाना पाटेकरांबरोबर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली पहिल्यांदाच वाईत शूटिंग करतेय. आणि वाईचे तीही तोंडभरून कौतुक करते. भव्य सेट आणि काश्मीर, शिमला या निसर्गस्थळांच्या प्रेमात आत्तापर्यंत पडलेला आपला सिनेमा. आता वेगळी वाट आणि जागाही चोखाळतोय. आणि वाईतला हा भागही सिनेमाचं महत्वाचे अंग ठरतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 01:29 PM IST

वाई होत आहे कॅमेर्‍यात बंद

अमोल परचुरे, मुंबई

22 मार्च

वाई हे मुळात थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण सध्या वाईत थंड हवेबरोबरच फिल्मी शूटिंगचेही वारे वाहू लागले आहेत. वाईत उमेश आणि गिरीश कुलकर्णीच्या देऊळ या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी देऊळमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी वाईत तळ ठोकून आहेत.

स्वदेस,अपहरण, राजनिती या हिट सिनेमात कथेबरोबरच एका ठिकाणाचेही महत्व होते. ते ठिकाण म्हणजे या सिनेमात दिसलेले निसर्गरम्य वाई. या वाईमध्येच आणि स्वदेसमध्ये दाखवलेल्या वाड्यातच सध्या देऊळ सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. तेव्हा शाहरूखचे वास्तव्य मिळालेल्या या वाड्याला आता नाना पाटेकरांमुळे अजून रंगत आलीय. वाईत आत्तापर्यंत तीन सिनेमांचे शूटिंग करणारे नाना पाटेकरही वाईच्या खूप प्रेमात आहे.

वाईला खर्‍या अर्थाने सिनेमात घेऊन आले दिग्दर्शक प्रकाश झा. त्यांनी आपल्या सिनेमातून उत्तर भारतीय संस्कृती दाखवली खरी पण त्याचं शूटिंग करण्यासाठी त्यांना वाईच्या आसपासचा भागच पसंत पडला . सध्याच्या दिग्दर्शकांनाही वाईचा हाच भाग आपल्या कॅमेर्‍यात टिपायचा आहे.

नाना पाटेकरांबरोबर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे सोनाली कुलकर्णी. सोनाली पहिल्यांदाच वाईत शूटिंग करतेय. आणि वाईचे तीही तोंडभरून कौतुक करते. भव्य सेट आणि काश्मीर, शिमला या निसर्गस्थळांच्या प्रेमात आत्तापर्यंत पडलेला आपला सिनेमा. आता वेगळी वाट आणि जागाही चोखाळतोय. आणि वाईतला हा भागही सिनेमाचं महत्वाचे अंग ठरतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close