S M L

पुण्यात दोन वर्षात 2,229 नागरिक बेपत्ता

22 मार्चपिंपरी चिंचवड परिसरातून गेल्या वर्षभरात शेकडो नागरिक अचानक बेपत्ता झाल्याच उघडकीस आलं आहे. यात अनेक महिलांसह अल्पवयीन मुले आणि मुलींचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षभरातील या घटनामुळे पोलिसांपुढे नवं आव्हान उभे ठाकले आहे.पिंपरी-चिचंवड शहरातील इनामदार कुटुंबावर गेल्या वर्षी 13 मार्च रोजी दुखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील मोठा मुलागा विशाल अचानक बेपत्ता झाला. पिंपरी-चिचंवड, निगडी, भोसरी, सांगवी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात तब्बल 2,229 नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 1233 जणांचा शोध लागला. पण 349- पुरुष, 376- महिला, 159- मुली, 92- मुलं अशा 976 जणांचा अद्यापही शोध लागु शकलेला नाही. आणि पोलीस मात्र ही जबाबदारी पालकांची आहे असं सांगत स्वत:वरची जबाबदारी झटकत आहे. पण तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप तक्रारदार करतायत.दोन वर्षात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होत असतील तर ही बाब गांभिर्यानं घेण्याची गरज आहे. पण पोलीस हे आव्हान पेलणार का ? असाच सवाल आता या बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक विचारत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 02:11 PM IST

पुण्यात दोन वर्षात 2,229 नागरिक बेपत्ता

22 मार्च

पिंपरी चिंचवड परिसरातून गेल्या वर्षभरात शेकडो नागरिक अचानक बेपत्ता झाल्याच उघडकीस आलं आहे. यात अनेक महिलांसह अल्पवयीन मुले आणि मुलींचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षभरातील या घटनामुळे पोलिसांपुढे नवं आव्हान उभे ठाकले आहे.

पिंपरी-चिचंवड शहरातील इनामदार कुटुंबावर गेल्या वर्षी 13 मार्च रोजी दुखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील मोठा मुलागा विशाल अचानक बेपत्ता झाला. पिंपरी-चिचंवड, निगडी, भोसरी, सांगवी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात तब्बल 2,229 नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 1233 जणांचा शोध लागला. पण 349- पुरुष, 376- महिला, 159- मुली, 92- मुलं अशा 976 जणांचा अद्यापही शोध लागु शकलेला नाही. आणि पोलीस मात्र ही जबाबदारी पालकांची आहे असं सांगत स्वत:वरची जबाबदारी झटकत आहे. पण तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप तक्रारदार करतायत.

दोन वर्षात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होत असतील तर ही बाब गांभिर्यानं घेण्याची गरज आहे. पण पोलीस हे आव्हान पेलणार का ? असाच सवाल आता या बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close