S M L

पुण्यात बिल्डराला धमकवल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल

22 मार्चबांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक अमर मुळचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक नानक पंजाबी यांची 70 लाख रुपये किंमतीची जागा फक्त 2 लाख रुपयात देण्यासाठी मुळचंदानी यांनी जबरदस्ती केली. तसेच विरोध केल्यामुळे ऑफिसमध्ये त्यांनी गंुड पाठवले अशी फिर्याद पंजाबी यांनी पिंपरी पोलिसांकडे दिली. त्यानुसार मूळचंदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धमकीचं सीसीटिव्ही फुटेजही पंजाबी यांनी पोलिसांना दिलंय. मात्र मुळचंदानी यांच्या राजकीय वजनामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मूळचंदानी यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 04:54 PM IST

पुण्यात बिल्डराला धमकवल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल

22 मार्चबांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक अमर मुळचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक नानक पंजाबी यांची 70 लाख रुपये किंमतीची जागा फक्त 2 लाख रुपयात देण्यासाठी मुळचंदानी यांनी जबरदस्ती केली.

तसेच विरोध केल्यामुळे ऑफिसमध्ये त्यांनी गंुड पाठवले अशी फिर्याद पंजाबी यांनी पिंपरी पोलिसांकडे दिली. त्यानुसार मूळचंदानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धमकीचं सीसीटिव्ही फुटेजही पंजाबी यांनी पोलिसांना दिलंय. मात्र मुळचंदानी यांच्या राजकीय वजनामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मूळचंदानी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close