S M L

लिबियात धुमश्चक्री सुरूच

22 मार्चअमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनी लिबियावर सुरू केलेल्या कारवाई चौथ्या दिवशी सुरूच आहे. या कारवाईला ओडिसी डॉन असं नाव देण्यात आलंय. याअंतर्गत आजही ट्रिपोली या लिबियाच्या राजधानीवर आणि बेनगाझी या विरोधकांच्या ताब्यातल्या शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले. दरम्यान झुवे तिनाह नावाच्या तेलसमृद्ध इलाख्याचा ताबा आज विरोधकांनी म्हणजेच निदर्शकांनी पुन्हा ताबा मिळवला. गेल्या आठवड्यात हा भाग गद्दाफींच्या फौजांनी मिळवला होता. आज गडाफींनी संयुक्त राष्ट्रांशी या कारवाई संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. पण ही मागणी फेटाळण्यात आली. दरम्यान, लिबियातल्या सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ यू ट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. राजधानी त्रिपोलीपासून 2 तासांच्या अंतरावर असलेल्या मिस्रता या शहरातला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ कधी घेतला गेला आणि हल्ल्यासाठी जबाबदार कोण याबद्दल नेमकी माहिती नाही. मिस्रता या शहरावर संकट कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 05:44 PM IST

लिबियात धुमश्चक्री सुरूच

22 मार्च

अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनी लिबियावर सुरू केलेल्या कारवाई चौथ्या दिवशी सुरूच आहे. या कारवाईला ओडिसी डॉन असं नाव देण्यात आलंय. याअंतर्गत आजही ट्रिपोली या लिबियाच्या राजधानीवर आणि बेनगाझी या विरोधकांच्या ताब्यातल्या शहरांवर हवाई हल्ले करण्यात आले. दरम्यान झुवे तिनाह नावाच्या तेलसमृद्ध इलाख्याचा ताबा आज विरोधकांनी म्हणजेच निदर्शकांनी पुन्हा ताबा मिळवला. गेल्या आठवड्यात हा भाग गद्दाफींच्या फौजांनी मिळवला होता. आज गडाफींनी संयुक्त राष्ट्रांशी या कारवाई संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. पण ही मागणी फेटाळण्यात आली.

दरम्यान, लिबियातल्या सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ यू ट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. राजधानी त्रिपोलीपासून 2 तासांच्या अंतरावर असलेल्या मिस्रता या शहरातला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ कधी घेतला गेला आणि हल्ल्यासाठी जबाबदार कोण याबद्दल नेमकी माहिती नाही. मिस्रता या शहरावर संकट कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close