S M L

हसन अलीबाबत मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद ?

22 मार्चहजारो कोटी रुपयांच्या काळ्या पैश्या प्रकरणी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट हसन अली याच्यावर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे हसन अली बाबत मुंबई पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद आहे. चौकशीत मुंबई पोलिसांनी हसन अलीवर मेहरबानी दाखवल्याची माहिती आयबीएन-लोकमतकडे उपलब्ध आहे. हसन अली अडचणीत आला आहे तो त्याच्या ए-6182426 नंबरच्या पासपोर्टमुळे. वरळी येथील प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसने 30 जानेवारी 2008 रोजी वरळी पोलीस स्टेशनमध्ये हसन अली विरोधात लेखी तक्रार दिली होती. ही तक्रार बोगस पासपोर्ट प्रकरणाची होती. हसन अलीने प्लॉट क्रमांक 27 , बिल्डिंग नं. 4 , चेंबूर कॉलनी, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई 74. हा पत्ता देऊन पासपोर्ट मिळवला होता. मात्र हा पत्ता खोटा होता. या पत्यावर हसन अली राहतच नव्हता. म्हणूनच खोटा पत्ता दिल्याच्या कारणावरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.यानंतर सुरु झाली हसन अलीविरोधात कारवाई पण हसन अली काही सापडत नव्हता. तपासावर लक्ष ठेऊन असणारे पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.हसन अली : काय झाली कारवाई ?- सर्वप्रथम हसन अली विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट झालं जारी - हसन अलीला मदत केल्याबद्दल त्याची बायको रिमा आणि मेव्हणा अब्बास यांनाही सहआरोपी करण्यात आलं- हसन अलीची माहिती आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यात आली- हसन अलीचा तपास लागत नसल्यामुळे अखेर त्याला फरारी घोषित करण्यात आलं- हसन अलीच्या मालमत्ता जप्ती कारवाईला सुरुवात- मग अटक टाळण्यासाठी हसन अलीची कोर्टात धावपळ सुरु - अखेर हसन अली पोलिसांच्या ताब्यातजोपर्यंत देशभ्रतार तपास करत होते तेव्हा कारवाईला वेग आला होता पण नंतर हा तपास गेला वरळी पोलिसाकडे. विरोधकांचा आरोप आहे की वरळी पोलिसाकडे तपास गेल्यावर कारवाईचा वेग मंदावला एवढंच काय याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलं नाही. पोलिसांची ही माहिती धक्कादायक आहे. हसन अलीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल आहे. सुप्रीम कोर्ट अंमलबजावणी संचालनालयावर योग्य तपास करत नसल्याने नाराज आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस फरार आरोपींना अटक करत नाहीत आरोपपत्र ही दाखल करत नाहीत. जोपर्यंत आरोप पत्र दाखल होत नाही तोपर्यत खटला चालणार नाही आणि जो पर्यत खटला चालणार नाही तोपर्यत हसन अलीला शिक्षा होणार नाही. आता हे सगळं स्पष्टपणे माहित असतानाही पोलीस हसन अलीवर कारवाई करण्यात एवढे उदासीन का ? याचं उत्तर खरंतर पोलीसच देऊ शकतात.हसन अलीच्या कबुलीजबाबाची सीडी भाजपचे आमदार देवेन्द्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केली होती. देशभ्रतार यांनीच ही सीडी बनवली होती असा आरोप आहे. या सीडीबद्दल सीआयडी आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट सीडीवर विश्वास ठेवायचा ? सीआयडीचा अहवाल- मीडियात प्रसिद्ध झालेल्या सीडीमध्ये फेरबदल करण्यात आले - हसन अलीचा कबुलीजबाब हवा तसा एडिट केला - व्हिडिओतील वेगवेगळे भाग एकाच सीडीत घुसवण्यात आले - चौकशीतला काही भाग जाणूनबुजून वगळण्यात आला चंदिगड फॉरेन्सिक लॅबचा अहवाल- सीडीतील ऑडिओ-व्हिज्युअल्स एकमेकांशी मिळतेजुळते नाहीत - वेगवेगळे भाग जोडून सलगता दाखवण्याचा प्रयत्न केला

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2011 06:25 PM IST

हसन अलीबाबत मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद ?

22 मार्च

हजारो कोटी रुपयांच्या काळ्या पैश्या प्रकरणी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट हसन अली याच्यावर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे हसन अली बाबत मुंबई पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद आहे. चौकशीत मुंबई पोलिसांनी हसन अलीवर मेहरबानी दाखवल्याची माहिती आयबीएन-लोकमतकडे उपलब्ध आहे.

हसन अली अडचणीत आला आहे तो त्याच्या ए-6182426 नंबरच्या पासपोर्टमुळे. वरळी येथील प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसने 30 जानेवारी 2008 रोजी वरळी पोलीस स्टेशनमध्ये हसन अली विरोधात लेखी तक्रार दिली होती. ही तक्रार बोगस पासपोर्ट प्रकरणाची होती. हसन अलीने प्लॉट क्रमांक 27 , बिल्डिंग नं. 4 , चेंबूर कॉलनी, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई 74. हा पत्ता देऊन पासपोर्ट मिळवला होता. मात्र हा पत्ता खोटा होता. या पत्यावर हसन अली राहतच नव्हता. म्हणूनच खोटा पत्ता दिल्याच्या कारणावरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर सुरु झाली हसन अलीविरोधात कारवाई पण हसन अली काही सापडत नव्हता. तपासावर लक्ष ठेऊन असणारे पोलीस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांनी कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.

हसन अली : काय झाली कारवाई ?

- सर्वप्रथम हसन अली विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट झालं जारी - हसन अलीला मदत केल्याबद्दल त्याची बायको रिमा आणि मेव्हणा अब्बास यांनाही सहआरोपी करण्यात आलं- हसन अलीची माहिती आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यात आली- हसन अलीचा तपास लागत नसल्यामुळे अखेर त्याला फरारी घोषित करण्यात आलं- हसन अलीच्या मालमत्ता जप्ती कारवाईला सुरुवात- मग अटक टाळण्यासाठी हसन अलीची कोर्टात धावपळ सुरु - अखेर हसन अली पोलिसांच्या ताब्यात

जोपर्यंत देशभ्रतार तपास करत होते तेव्हा कारवाईला वेग आला होता पण नंतर हा तपास गेला वरळी पोलिसाकडे. विरोधकांचा आरोप आहे की वरळी पोलिसाकडे तपास गेल्यावर कारवाईचा वेग मंदावला एवढंच काय याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलं नाही.

पोलिसांची ही माहिती धक्कादायक आहे. हसन अलीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल आहे. सुप्रीम कोर्ट अंमलबजावणी संचालनालयावर योग्य तपास करत नसल्याने नाराज आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलीस फरार आरोपींना अटक करत नाहीत आरोपपत्र ही दाखल करत नाहीत. जोपर्यंत आरोप पत्र दाखल होत नाही तोपर्यत खटला चालणार नाही आणि जो पर्यत खटला चालणार नाही तोपर्यत हसन अलीला शिक्षा होणार नाही. आता हे सगळं स्पष्टपणे माहित असतानाही पोलीस हसन अलीवर कारवाई करण्यात एवढे उदासीन का ? याचं उत्तर खरंतर पोलीसच देऊ शकतात.

हसन अलीच्या कबुलीजबाबाची सीडी भाजपचे आमदार देवेन्द्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केली होती. देशभ्रतार यांनीच ही सीडी बनवली होती असा आरोप आहे. या सीडीबद्दल सीआयडी आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट

सीडीवर विश्वास ठेवायचा ?

सीआयडीचा अहवाल

- मीडियात प्रसिद्ध झालेल्या सीडीमध्ये फेरबदल करण्यात आले - हसन अलीचा कबुलीजबाब हवा तसा एडिट केला - व्हिडिओतील वेगवेगळे भाग एकाच सीडीत घुसवण्यात आले - चौकशीतला काही भाग जाणूनबुजून वगळण्यात आला चंदिगड फॉरेन्सिक लॅबचा अहवाल

- सीडीतील ऑडिओ-व्हिज्युअल्स एकमेकांशी मिळतेजुळते नाहीत - वेगवेगळे भाग जोडून सलगता दाखवण्याचा प्रयत्न केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2011 06:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close