S M L

मोनिका हत्याप्रकरणी 13व्या दिवशीही मारेकरी मोकाट

23 मार्चनागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हिच्या हत्येला 13 दिवस उलटले आहे. पण अजून मारेकर्‍यांची माहिती मिळाली नाही. मोनिकाची हत्या करणार्‍या आरोपींची माहिती देणार्‍याला सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तसेच साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्याची घोषणाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. नागपूरमध्ये भरदिवसा मोनिकाची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक हजर होते. पण आरोपींची माहिती देण्यासाठी त्यापैकी कुणीही पुढं येत नाहीय. त्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येतंय. त्यामुळे आरोपींची माहिती देणार्‍यास अखेर राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, याच विषयावर आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी आपला फोन नंबर देत लोकांना मदतीचं आवाहन केलं. मोनिका हत्याप्रकरणात कोणतीही माहिती असेल तर थेट लोकांनी त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 9096044477 यावर संपर्क साधावा असं त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:32 PM IST

मोनिका हत्याप्रकरणी 13व्या दिवशीही मारेकरी मोकाट

23 मार्च

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे हिच्या हत्येला 13 दिवस उलटले आहे. पण अजून मारेकर्‍यांची माहिती मिळाली नाही. मोनिकाची हत्या करणार्‍या आरोपींची माहिती देणार्‍याला सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तसेच साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्याची घोषणाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. नागपूरमध्ये भरदिवसा मोनिकाची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो नागरिक हजर होते. पण आरोपींची माहिती देण्यासाठी त्यापैकी कुणीही पुढं येत नाहीय. त्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येतंय. त्यामुळे आरोपींची माहिती देणार्‍यास अखेर राज्य सरकारनं बक्षीस जाहीर केले आहे.

दरम्यान, याच विषयावर आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी आपला फोन नंबर देत लोकांना मदतीचं आवाहन केलं. मोनिका हत्याप्रकरणात कोणतीही माहिती असेल तर थेट लोकांनी त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 9096044477 यावर संपर्क साधावा असं त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close