S M L

वानखेडे स्टेडियमला कडेकोट बंदोबस्त

23 मार्च2 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. आणि त्यामुळे फायनलसाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहेत. हल्ल्याचे संकेत मिळण्याआधी फायनल मॅचसाठी 6 ते 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार होता. पण आता यात दुपट्टीने वाढ करण्यात आली. याआधी प्रत्येक 15 फुटांवर पोलीस तैनात करणार होते. ते आता प्रत्येकी दोन फुटावर तैनात करण्यात येणारे आहे. एस. आर. पीच्या 2 कंपनी तैनात करण्यात येणार होत्या तर त्यात वाढ करुन आता 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच अगोदर शीघ्र दलाची 2 पथकं तैनात करण्यात येणार होती. तर त्यात वाढ करुन आता 5 शीघ्रकृती दलाची पथक तैनात करण्यात येणार आहेत. इतकचं नाही तर 100 पेक्षा जास्त साध्या वेशातील पोलिस मॅचदरम्यान वानखेडेवर असतील आणि एटीएसचे विशेष पथकही तैनात करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 10:52 AM IST

वानखेडे स्टेडियमला कडेकोट बंदोबस्त

23 मार्च

2 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. आणि त्यामुळे फायनलसाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहेत. हल्ल्याचे संकेत मिळण्याआधी फायनल मॅचसाठी 6 ते 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार होता. पण आता यात दुपट्टीने वाढ करण्यात आली.

याआधी प्रत्येक 15 फुटांवर पोलीस तैनात करणार होते. ते आता प्रत्येकी दोन फुटावर तैनात करण्यात येणारे आहे. एस. आर. पीच्या 2 कंपनी तैनात करण्यात येणार होत्या तर त्यात वाढ करुन आता 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच अगोदर शीघ्र दलाची 2 पथकं तैनात करण्यात येणार होती. तर त्यात वाढ करुन आता 5 शीघ्रकृती दलाची पथक तैनात करण्यात येणार आहेत. इतकचं नाही तर 100 पेक्षा जास्त साध्या वेशातील पोलिस मॅचदरम्यान वानखेडेवर असतील आणि एटीएसचे विशेष पथकही तैनात करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close