S M L

अर्थसंकल्पीय भाषणात लोकप्रतिनिधींची गप्पांची मैफल

23 मार्चमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं पहिलंच अर्थसंकल्पीय भाषण. एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर होताच पण खुद्द सत्ताधारी पक्षांचे नेते तरी कुठे गांभीर्याने दादांचे भाषण ऐकत होते. सभागृहात तर काही नेत्यांची गप्पांची मैफल रंगली होती तर काही आमदार मस्तपैकी सभागृहातच फेरफटका मारत होते. राज्याचे आजी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि रमेश बागवे एकमेकांना टाळ्या देत हास्यविनोदात दंग होते. महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांवर टीका करणारे काँग्रेसचे आमदार राजहंस सिंग अध्यक्षांकडे पाठ करुन चक्क गप्पा मारण्यात गर्क होते. तर राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण-विखे पाटील आणि आरोग्यशिक्षण मंत्री विजयकुमार गावित हे तर बराच वेळ गप्पांमध्ये व्यस्त होते. तर सभागृहात भाषणादरम्यान सर्वात जास्त चुळबूळ सुरु होती बाबा सिद्दीकींची. बसल्या जागेवरुन हातवारे करणे, मागील बाकावरील आमदारांशी गप्पा, एवढंच नाही तर जागेवरुन उठून इतर नेत्यांबरोबर कानगोष्टी अगदी या बाबांनी शांत बसलेल्या नारायण राणेंनासुध्दा आपल्या चर्चेत सहभागी करुन घेतलं होतं. पुढच्या बाकावरील नेत्यानाच जर गांभीर्य नसेल तर बॅकबेंचर्सना तरी अर्थसंकल्पाच्या भाषणाचे कशाला महत्त्व वाटेल. दूरदर्शनचे कॅमेरे लागलेत आणि पूर्ण राज्यात आपलं हे असंसदीय वर्तन जनतेला दिसतंय याचंही भान या नेत्यांना उरलेले नसावे. विरोधकांना जो काही हल्लाबोल करायचा होता त्यासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अडथळे आणण्याची गरज होती का या प्रश्नाबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तरी राज्याच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व उरलंय का हा प्रश्नही उपस्थित झालेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 01:06 PM IST

अर्थसंकल्पीय भाषणात लोकप्रतिनिधींची गप्पांची मैफल

23 मार्च

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं पहिलंच अर्थसंकल्पीय भाषण. एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर होताच पण खुद्द सत्ताधारी पक्षांचे नेते तरी कुठे गांभीर्याने दादांचे भाषण ऐकत होते. सभागृहात तर काही नेत्यांची गप्पांची मैफल रंगली होती तर काही आमदार मस्तपैकी सभागृहातच फेरफटका मारत होते. राज्याचे आजी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि रमेश बागवे एकमेकांना टाळ्या देत हास्यविनोदात दंग होते.

महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांवर टीका करणारे काँग्रेसचे आमदार राजहंस सिंग अध्यक्षांकडे पाठ करुन चक्क गप्पा मारण्यात गर्क होते. तर राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण-विखे पाटील आणि आरोग्यशिक्षण मंत्री विजयकुमार गावित हे तर बराच वेळ गप्पांमध्ये व्यस्त होते. तर सभागृहात भाषणादरम्यान सर्वात जास्त चुळबूळ सुरु होती बाबा सिद्दीकींची. बसल्या जागेवरुन हातवारे करणे, मागील बाकावरील आमदारांशी गप्पा, एवढंच नाही तर जागेवरुन उठून इतर नेत्यांबरोबर कानगोष्टी अगदी या बाबांनी शांत बसलेल्या नारायण राणेंनासुध्दा आपल्या चर्चेत सहभागी करुन घेतलं होतं. पुढच्या बाकावरील नेत्यानाच जर गांभीर्य नसेल तर बॅकबेंचर्सना तरी अर्थसंकल्पाच्या भाषणाचे कशाला महत्त्व वाटेल.

दूरदर्शनचे कॅमेरे लागलेत आणि पूर्ण राज्यात आपलं हे असंसदीय वर्तन जनतेला दिसतंय याचंही भान या नेत्यांना उरलेले नसावे. विरोधकांना जो काही हल्लाबोल करायचा होता त्यासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अडथळे आणण्याची गरज होती का या प्रश्नाबरोबरच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तरी राज्याच्या अर्थसंकल्पाचे महत्त्व उरलंय का हा प्रश्नही उपस्थित झालेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close