S M L

विंडीजचा धुव्वा उडवत पाकिस्तान सेमीफायनमध्ये

23 मार्चवेस्ट इंडिजला हरवत वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलला पोहचणारी पाकिस्तान पहिली टीम ठरली आहे. आज बुधवारी झालेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने वेस्टइंडिजचा 10 विकेटने धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. क्वार्टरफायनलची पहिलीच मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून होते. पण ही मॅच कमालीची एकतर्फी झाली. पहिली बॅटिंग करणारी वेस्टइंडिजची टीम 112 रन्सवर ऑलआऊट झाली. विजयाचे हे माफक आव्हान पाकिस्तानने 10 विकेट राखत 21 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. ओपनर कामरान अकमलनं 47 तर मोहम्मद हाफिजने 61 रन्स केले. त्याआधी शाहिद आफ्रिदीच्या प्रभावी बॉलिंगसमोर विंडीजची टीम सपशेल फ्लॉप ठरली. शाहिद आफ्रिदीने अवघ्या 30 रन्समध्ये सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.पाकिस्तानने वेस्टइंडिजवर मात करत सेमीफायनल गाठली. आणि पाकिस्तानच्या या दमदार विजयामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजय साजरा केला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2011 02:01 PM IST

विंडीजचा धुव्वा उडवत पाकिस्तान सेमीफायनमध्ये

23 मार्च

वेस्ट इंडिजला हरवत वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलला पोहचणारी पाकिस्तान पहिली टीम ठरली आहे. आज बुधवारी झालेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने वेस्टइंडिजचा 10 विकेटने धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. क्वार्टरफायनलची पहिलीच मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी बाळगून होते. पण ही मॅच कमालीची एकतर्फी झाली. पहिली बॅटिंग करणारी वेस्टइंडिजची टीम 112 रन्सवर ऑलआऊट झाली. विजयाचे हे माफक आव्हान पाकिस्तानने 10 विकेट राखत 21 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. ओपनर कामरान अकमलनं 47 तर मोहम्मद हाफिजने 61 रन्स केले. त्याआधी शाहिद आफ्रिदीच्या प्रभावी बॉलिंगसमोर विंडीजची टीम सपशेल फ्लॉप ठरली. शाहिद आफ्रिदीने अवघ्या 30 रन्समध्ये सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

पाकिस्तानने वेस्टइंडिजवर मात करत सेमीफायनल गाठली. आणि पाकिस्तानच्या या दमदार विजयामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजय साजरा केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2011 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close